घरात मोठ्या संख्येने मुंग्यांचा शिरकाव झाला तर ते शुभ मानले पाहिजे की अशुभ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 02:07 PM2021-05-21T14:07:44+5:302021-05-21T14:08:16+5:30

मुंग्या घरात प्रवेश करणे सामान्य आहे, परंतु या मुंग्या सतत एकाच ठिकाणाहून किंवा विशिष्ट दिशेने येताना पुष्कळसे संकेत देतात. घरात लाल मुंग्यांची संख्या वाढतेय की काळ्या मुंग्यांची, यावरून ज्योतिषशास्त्राने उकल काढली आहे. 

If a large number of ants enter the house, should it be considered auspicious or ominous? | घरात मोठ्या संख्येने मुंग्यांचा शिरकाव झाला तर ते शुभ मानले पाहिजे की अशुभ?

घरात मोठ्या संख्येने मुंग्यांचा शिरकाव झाला तर ते शुभ मानले पाहिजे की अशुभ?

googlenewsNext

मुंग्या लाल आहेत  की काळ्या? तसेच एखाद्या विशिष्ट मार्गाने येत असल्या तर अनेक प्रकारचे संकेत मिळतात. म्हणून जर तुम्हाला घरी मुंग्या दिसल्या तर नक्कीच त्यांच्याकडे लक्ष द्या. तसेच, मुंग्या घरात वरच्या किंवा खालच्या दिशेने जात आहेत. याशिवाय आपल्या घरात मुंग्यांना काही खायला मिळत आहे की नाही, बर्‍याच घटनांबाबतही संकेत आहेत. 

जर तुमच्या घरी काळया मुंग्या येत असतील तर ही सुखी आणि समृद्धीची चिन्हे आहेत. त्याच वेळी, जेव्हा आपण घरात लाल मुंग्या पाहता तेव्हा सावधगिरी बाळगा. लाल मुंग्या अशुभ मानल्या जातात. त्यांचे दृष्य भविष्यातील त्रास, विवाद, पैसे खर्च होणार असल्याचे दर्शवितात.

वरच्या बाजूने जाणारी काळया मुंग्यांची रांग तुमचा उत्कर्ष दाखवते. तर खालच्या बाजूने जाणारी रांग अधोगती दर्शवते. 

बऱ्याच वेळा लोक काळ्या मुंग्यांना साखर, पीठ इत्यादी घालतात. कारण काळी मुंगी देवमुंगी मानतात आणि तिला साखर घालणे शुभ मानतात. साखरेच्या डब्याला मुंग्या येत असतील तर काही नवीन नाही, पण जर या मुंग्या तांदळाच्या डब्याला येत असतील, तर काही दिवसांतच तुमच्या पैशाची वाढ होणार हे एक शुभ चिन्ह आहे. त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. भौतिक सुखसुविधा असलेल्या गोष्टींसाठी काळ्या मुंग्या येणे शुभ मानले जाते.

लाल मुंग्या घरातून बाहेर जाताना दिसत असतील तर तेही शुभ चिन्ह आहे. लाल मुंग्या कडकडून चावतात. याच कारणाने बहुदा त्यांना राक्षस मुंग्या म्हटले जात असावे. अशा मुंग्यांनी त्वरित घराबाहेरच मार्ग निवडावा म्हणून त्यांच्यासाठी अन्नपदार्थ किंवा चिमूटभर साखर दाराबाहेर टाकावी. त्यांना घराबाहेर पाठवावे, पण जाता जाता त्यांनाही अन्नदान करावे. 

मुंग्या कुठल्या दिशेने घरात शिरकाव करत आहेत, यानेही खूप फरक पडतो. जर घरात काळ्या मुंग्या उत्तरेकडून येत असतील तर ती तुमच्यासाठी शुभ चिन्हे आहेत. पूर्वेकडून मुंग्यांचे आगमन म्हणजे आपल्या घरी कोणतीही सकारात्मक माहिती येऊ शकते. त्याच वेळी, पश्चिम दिशेने मुंग्या आल्यामुळे, बाहेरच्या प्रवासाची तयारी होऊ शकते. परंतु दक्षिण दिशेने मुंग्या येत असल्यास त्यांना त्वरित प्रतिबंध घालावा. 

Web Title: If a large number of ants enter the house, should it be considered auspicious or ominous?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.