स्वप्नात 'या' गोष्टी दिसत असतील, तर ते आहेत धनप्राप्तीचे संकेत; स्वप्नशास्त्र काय सांगते पहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 01:16 PM2021-05-28T13:16:29+5:302021-05-28T13:17:18+5:30
या सगळ्या गोष्टी आपण ठरवून स्वप्नात पाहू शकत नाही. परंतु जर अचानक या गोष्टी तुम्हाला दिसल्या, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर वैभवप्राप्तीची संधी गमावून बसाल.
दरदिवशी आपल्याला वेगवेगळी स्वप्नं पडत असतात. काही आठवतात तर काही झोपेतून उठताच क्षणी विसरून जायला होतात. काही स्वप्नांचे आपण अर्थ शोधत असतो, तर काही स्वप्नं आपल्याला शुभ संकेत देणारीही असतात. स्वप्नशास्त्रानुसार अशाच काही संकेतांचा आढावा आपण घेणार आहोत. ज्यावरून आगामी काळात धनप्राप्तीच्या सूचना मिळतात. ते संकेत कोणकोणते, जाणून घेऊया.
1. जर आपणास बिळातून साप बाहेर येताना दिसला, तर अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता असते.
२. जर आपण स्वप्नात स्वत:ला झाडावर चढताना पाहिले, तर व्यवसायात, नोकरीत आपली प्रगती होणार असून आर्थिक वाढ होण्याचे संकेत असतात.
३. जर आपण एखादी स्त्री किंवा मुलगी स्वप्नात नाचताना पाहिली तर ते केवळ विलासाचे लक्षण नाही, तर कंचन आणि कांचन अर्थात स्त्रीयोग आणि संपत्तीयोग जुळून येणार असल्याचे ते भाकीत असते.
४. सोनेखरेदीचे, सोन्याच्या अलंकाराचे स्वप्न पाहिले असेल, तर लवकरच सुवर्णयोग तुमची वाट पाहत आहे, हे लक्षात घ्या.
५. जर आपण स्वप्नात कोंबडा आरवताना पाहिला, तर तेदेखील तुमच्या भाग्योदयाचे लक्षण मानले जाते.
६. एरव्ही घरात उंदीर दिसले की आपल्या कपाळावर आठ्या येतात, पण स्वप्नात धान्याच्या राशींवर उंदीर लोळत पडलेले दिसले, तर ते श्रीमंतीचे लक्षण समजावे. त्यामुळे संपत्तीचे आगमन होणार आहे, असे समजावे.
७. लक्ष्मीपूजनाचे स्वप्न किंवा पूजेबद्दल बातचीत करण्याचे स्वप्न पडत असेल, तर लक्ष्मीपूजा अवश्य करून घ्या. माता लक्ष्मी तिच्या आगमनाचे संकेत देत असते.
८. दिवसा अलंकार आपण पाहतोच, परंतु स्वप्नातही विविध प्रकारचे अलंकार दिसत असतील, तर तुमच्याकडे धन, वैभव प्राप्तीची साधने उपलब्ध होणार आहेत असे समजावे.
९. जर आपणास स्वप्नात दिवा जळताना दिसला तर तुम्हाला प्रचंड पैसा मिळणार आहे.
१०. जर आपण स्वत: ला स्वप्नात अंगठी घातलेली पाहिली असेल तर ते लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण असू शकते.
या सगळ्या गोष्टी आपण ठरवून स्वप्नात पाहू शकत नाही. परंतु जर अचानक या गोष्टी तुम्हाला दिसल्या, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर वैभवप्राप्तीची संधी गमावून बसाल.