नोकरी, व्यवसाय, लग्नकार्यात अडचणी येत असतील तर 'हे' तोडगे खास तुमच्यासाठी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 02:37 PM2022-05-05T14:37:58+5:302022-05-05T14:38:21+5:30

लग्न, नोकरी, व्यवसाय यांसारख्या आयुष्याला वळण देणाऱ्या गोष्टींमध्ये अडचणी आल्या तर यशाची गाडी अडखळते. ती सुरळीतपणे चालावी म्हणून पुढील उपाय... 

If you are facing difficulties in job, business, marriage, then this solution is especially for you! | नोकरी, व्यवसाय, लग्नकार्यात अडचणी येत असतील तर 'हे' तोडगे खास तुमच्यासाठी!

नोकरी, व्यवसाय, लग्नकार्यात अडचणी येत असतील तर 'हे' तोडगे खास तुमच्यासाठी!

googlenewsNext

धार्मिक ग्रंथांनुसार गुरुवार हा बृहस्पति आणि भगवान विष्णूच्या पूजेचा दिवस आहे. या दिवशी विधिपूर्वक भगवान विष्णूची पूजा केल्याने विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि संकटातून मार्ग सापडायला मदत होते. यासाठी कुंडलीतील गुरुबळ भक्कम असावे लागते. विष्णू पूजेमुळे गुरुस्थान भक्कम होते. त्यासाठी कोणकोणते उपाय करता येतात ते जाणून घ्या. 

ज्योतिष शास्त्रानुसार लग्नाला उशीर, व्यवसायात यश किंवा पैशाशी संबंधित समस्यांवर गुरुवारी काही उपाय सांगण्यात आले आहेत. या दिवशी जर हे उपाय केले तर जीवनातील या सर्व समस्या आणि त्रास दूर होऊ शकतात.गुरुवारी करावयाचे उपाय जाणून घ्या.

गुरुवारी हे उपाय करा

लग्न लवकर ठरावे असे वाटत असेल तर विवाहेच्छुनी विष्णूचे व्रत अंगीकारावे. जसे की एकादशीचा उपास, विष्णू सहस्त्र नामाचे पठण, दैनंदिन पूजा इ. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि विवाहातील अडचणी दूर होतात. 

ही उपासना करताना व्रतकर्त्याने पिवळे वस्त्र परिधान करावे. तसेच या दिवशी देवाला पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करावा. असे मानले जाते की या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे सेवन केल्याने देवाची कृपा प्राप्त होते. 

'ओम नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र तर जादूसारखा असर करतो. फक्त त्या मंत्राचा दररोज ठराविक वेळी मनोभावे जप केला पाहिजे. 

आर्थिक समस्यांवर उपाय
आर्थिक अडचणींचा सामना करत असाल, तर वर दिलेला विष्णू मंत्र म्हणा व त्याच बरोबरीने काही नियम अवश्य पाळा. जसे की गुरुवारी नखे कापू नका, केस कापू नका. 

पदोन्नती मिळविण्याचे मार्ग
खूप प्रयत्न करूनही ऑफिसमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा प्रमोशन खूप दिवसांपासून रखडले असेल तर गुरुवारी कोणतीही पिवळी वस्तू दान करा. तसे करणे योग्य मानले जाते. या दिवशी पिवळ्या मिठाई, पिवळी मसूर किंवा पिवळ्या रंगाची फळे किंवा कपडे इत्यादी दान करू शकता.

व्यवसायात प्रगती करण्यासाठी हे उपाय करा
व्यवसायात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत असेल किंवा प्रगती साधायची असेल तर यासाठी विष्णूंसोबत लक्ष्मीची पूजा करावी. तसेच, पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करा आणि यथाशक्ती गोरगरिबांना दान करा.

Web Title: If you are facing difficulties in job, business, marriage, then this solution is especially for you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.