दुसऱ्यांच्या तुलनेत तुम्ही अपयशी, असमाधानी असाल तर त्यामागे आहेत 'ही' तीन कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 03:36 PM2022-03-25T15:36:47+5:302022-03-25T15:37:05+5:30

'या' तीन नियमांशी वचनबद्ध व्हा आणि यशस्वी व्हा!

If you are unsuccessful, dissatisfied compare to others, then there are three reasons behind it! | दुसऱ्यांच्या तुलनेत तुम्ही अपयशी, असमाधानी असाल तर त्यामागे आहेत 'ही' तीन कारणं!

दुसऱ्यांच्या तुलनेत तुम्ही अपयशी, असमाधानी असाल तर त्यामागे आहेत 'ही' तीन कारणं!

Next

जर तुम्हाला जीवनात यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम, बुद्धिमत्ता, क्षमता यासोबतच इतर काही गोष्टींची गरज आहे. यामध्ये व्यक्तीची योग्य वागणूक आणि सवयी खूप महत्त्वाच्या असतात. या दोन्ही गोष्टींमध्ये गडबड झाली, तर यश मिळाल्यावर माणूस पुन्हा अपयशाच्या दरीत ओढला जाऊ शकतो. आचार्य चाणक्य सांगतात, की ज्या व्यक्तीला यश हवे आहे त्याने अत्यंत सावधपणे वागले पाहिजे.

चाणक्य नीतिनुसार काही चुका टाळल्या पाहिजेत.अन्यथा तुमच्या यशाचा आलेख उतरंडीला लागू शकतो. 

कधीही चुकीच्या गोष्टी करू नका: ज्या व्यक्तीला यश हवे आहे त्याने कधीही अनैतिक गोष्टी करू नयेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळते आणि त्याच गोष्टी यशाच्या मार्गात अडथळा बनतात. चुकीच्या सवयी व्यक्तीला त्याच्या ध्येयापासून विचलित करतात, म्हणून वाईट सवयीच्या लोकांपासून दूर रहा.

बचत करा: चांगले शिक्षण, आरोग्य आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी पैसे खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु जास्त काळ विनाकारण पैसे खर्च केल्याने श्रीमंत माणूसही गरीब होऊ शकतो. त्यामुळे वाईट काळासाठी बचत करण्याचे सुनिश्चित करा. अन्यथा, उधळपट्टीमुळे तुमचे चांगले जीवन दारिद्रयात ढकलले जाऊ शकते. 

वेळेचे महत्त्व समजून घ्या : ज्या व्यक्तीला यश मिळवायचे आहे त्याने आपल्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला पाहिजे. वेळेला पैशांइतके महत्त्व दिले पाहिजे. ज्याप्रमाणे पैसा आपण जपून आणि योग्य ठिकाणी वापरतो, तसाच वेळही जपून वापरायला हवा. 

या तीन गोष्टी तुमच्या आयुष्याची घडी बसवू शकतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बसलेली घडी बिघडवूदेखील शकतात. नियमांशी वचनबद्ध व्हा आणि यशस्वी व्हा!

Web Title: If you are unsuccessful, dissatisfied compare to others, then there are three reasons behind it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.