पोवळे वापरत असाल तर जरा सांभाळून; त्याची पारख करून आणि नियम वाचूनच धारण करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 06:15 PM2022-03-15T18:15:49+5:302022-03-15T18:16:43+5:30

केवळ शोभेसाठी पोवळे घालणे महाग पडू शकते. सामान्यतः कडक किंवा सौम्य मंगळ असलेल्या लोकांना पोवळे घालण्याचा सल्ला दिला जातो.

If you are using coral gem, be careful; Hold on by judging and reading the rules! | पोवळे वापरत असाल तर जरा सांभाळून; त्याची पारख करून आणि नियम वाचूनच धारण करा!

पोवळे वापरत असाल तर जरा सांभाळून; त्याची पारख करून आणि नियम वाचूनच धारण करा!

googlenewsNext

ज्योतिषशास्त्रात पोवळे हे मंगळाचे रत्न मानले जाते. मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. अशा स्थितीत हे रत्न धारण केल्याने व्यक्तीमध्ये शत्रूंचा पराभव करण्याची जबरदस्त शक्ती येते असे म्हणतात. ज्योतिषांच्या मते मंगळाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी पोवळे धारण करावे. पण, ते कसे परिधान करावे आणि ते परिधान करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेणेही महत्त्वाचे ठरते. 

पोवळे हे मंगळाचे रत्न आहे

ज्योतिषशास्त्रानुसार पोवळे हे रत्न ऊर्जेचे प्रतीक आहे. ते परिधान केल्याने आत्मविश्वास, धैर्य आणि शक्ती वाढते. मात्र ते कोणीही घालून चालत नाही. केवळ शोभेसाठी पोवळे घालणे महाग पडू शकते. सामान्यतः कडक किंवा सौम्य मंगळ असलेल्या लोकांना पोवळे घालण्याचा सल्ला दिला जातो.

पोवळे कसे ओळखावे?

ज्योतिष शास्त्रानुसार पोवळे धारण करण्यापूर्वी त्याची ओळख होणे आवश्यक आहे. पोवळ्याची नीट चाचणी करण्यासाठी, पोवळ्यावर पाण्याचा थेंब टाका. मग पाण्याची स्थिती पहा. पोवळ्यावर पाणी स्थिर राहिल्यास ते खरे पोवळे नाही. खऱ्या पोवळ्यावर पाणी टाकले असता ते ओघळून जाते. पोवळे नेहमी चांदी, सोने या धातूंबरोबर परिधान करावे. पुष्कराज, मोती आणि माणिकासह देखील परिधान केले जाऊ शकते.

कुंडली दाखवून पोवळे धारण करा

पोवळे अकारण परिधान करू नये. ते परिधान करण्यापूर्वी, जन्म पत्रिका जाणकार व्यक्तीला दाखवावी. जन्मपत्रिका न दाखवता पोवळे घातल्याने अपघात होऊ शकतो. तसेच, जीवनात मोठ्या समस्या उद्भवू शकतात. जर पोवळे अनुकूल नसेल तर ते घातक परिणाम देखील देऊ शकतात. याशिवाय कुंडलीत शनि आणि मंगळाचा समतोल असेल तरीही पोवळे धारण करू नये

Web Title: If you are using coral gem, be careful; Hold on by judging and reading the rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.