सर्व प्रकारच्या दुःखाचा शेवट करायचा असेल तर मंत्र एकच- सोडून द्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 11, 2021 07:15 PM2021-02-11T19:15:04+5:302021-02-11T19:15:28+5:30

मूर्ख लोकांशी वाद घालून मूर्खांची संख्या एकाने वाढवू नये.

If you want to end all kinds of sorrow, the mantra is one - leave it! | सर्व प्रकारच्या दुःखाचा शेवट करायचा असेल तर मंत्र एकच- सोडून द्या!

सर्व प्रकारच्या दुःखाचा शेवट करायचा असेल तर मंत्र एकच- सोडून द्या!

Next

कोणी आपल्यासमोर त्याचे दुःख उगाळू लागले, की सांत्वनपर आपण एकच वाक्य म्हणतो, 'जाऊ द्या, सोडून द्या...!' पण वेळ जेव्हा आपल्यावर येते, तेव्हा हे शब्द कानावर पडताच आपण राग राग करतो. परंतु, शांत डोक्याने विचार केला, तर काही गोष्टी सोडून देण्यातच खरे शहाणपण असते. स्वामी विवेकानंद म्हणत, 'मूर्ख लोकांशी वाद घालून मूर्खांची संख्या एकाने वाढवू नये.' त्याप्रमाणे ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात नाहीत, त्या सोडून द्याव्यात आणि नवीन गोष्टींचा ध्यास घेऊन आयुष्य सुरु ठेवावे. समाज माध्यमावर वाचण्यात आलेल्या एका कवितेत खूप छान वर्णन केले आहे,

एकदोन वेळा समजावून 
सांगूनही पटत नसेल
तर समोरच्याला समजावणं 
सोडून द्यावं

ऐकूनही न ऐकल्या सारखं करत असतील तर उगाचंच संवाद साधणं 
सोडून द्यावं

मुलं मोठी झाल्या वर स्वतंत्रपणे 
निर्णय घेत असतील 
तर पाठीमागे लागणं 
सोडून द्यावं

एका ठराविक वयानंतर 
कोणी नावं ठेवली
तर मनावर घेणं 
सोडून द्यावं

आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं 
सोडून द्यावं

ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं
सोडून द्यावं

प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, 
आकार, रंग सगळंच वेगळं
म्हणूनच म्हणतो तुलना करणं 
सोडून द्यावं

आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्या नंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं  
सोडून द्यावं

Web Title: If you want to end all kinds of sorrow, the mantra is one - leave it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.