दाम्पत्य जीवन सुखीसमाधानी राहावे वाटत असेल तर बेडरूममध्ये वास्तुशास्त्रात सांगितलेले बदल करा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 04:53 PM2021-11-26T16:53:16+5:302021-11-26T16:54:28+5:30

नाते संबंधांच्या दृष्टीने बेडरूम हा घराचा महत्त्वाचा घटक आहे. तो दुर्लक्षित न करता, जुजबी बदल करा आणि आपले नाते व वास्तू यांना सकारात्मक ऊर्जा द्या. 

If you want to have a happy married life, make the changes in the bedroom architecture! | दाम्पत्य जीवन सुखीसमाधानी राहावे वाटत असेल तर बेडरूममध्ये वास्तुशास्त्रात सांगितलेले बदल करा! 

दाम्पत्य जीवन सुखीसमाधानी राहावे वाटत असेल तर बेडरूममध्ये वास्तुशास्त्रात सांगितलेले बदल करा! 

Next

बेडरूमचा वास्तू दोष खूप हानिकारक आहे. वास्तुदोषामुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा केवळ पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण करत नाही. यासोबतच घरातील इतर लोकांच्या सुख-समृद्धीमध्येही अडथळा निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये सकारात्मक वातावरण असले पाहिजे. वास्तूनुसार बेडरूमच्या दिशेलाही विशेष महत्त्व आहे. बेडरूम योग्य दिशेला असेल तर घरातील लोकांचे परस्पर संबंध चांगले राहतात. नातेसंबंध चांगले असले की घरातील सर्वांची योग्य दिशेने प्रगती होते. 

बेडरूमची दिशा

वास्तूनुसार मास्टर बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असावी. बेडरुममध्ये देवघर असू नये. त्याचप्रमाणे बेडरूमच्या भिंतीवर आपल्या पूर्वजांचे फोटो लावू नये. याशिवाय बेडरूममध्ये आक्रमक किंवा मन विचलित करणारे चित्र नसावे. बेडरूमधील बेड कधीही दारासमोर नसावा. बेडरूममधला आरसा पलंगाच्या समोर नसावा. बेडरूमच्या भिंतीचा रंग गडद नसावा, तर पिवळा, गुलाबी, आकाशी असा फिकट असावा. बेडरूमच्या भिंतींवर आल्हाददायक चित्रं असावीत. मोरपंख किंवा राधा कृष्णाचा फोटो लावणेही इष्ट ठरेल. तसेच चांगल्या नाते संबंधासाठी बेडरूमच्या दारामागे बासरीची जोडी लाल रिबीनीने बांधून लावावी असेही सांगितले जाते. 

इलेक्ट्रॉनिक वस्तू 

बेडरूममध्ये शक्यतो इलेक्ट्रॉनिक वस्तू नसाव्यात. आणि असल्याच तर खोलीच्या आग्नेय दिशेला ठेवाव्यात. परंतु वास्तू तज्ञांनुसार सर्व प्रकारही गॅझेट शक्यतो आपल्या झोपण्याच्या खोलीपासून दूर असावीत. कारण दिवसभर आपण त्या विद्युत लहरींच्या प्रभावात असतो, निदान रात्री शांततेत झोप घ्यावी एवढेच त्यामागचे कारण असते. 

वास्तूचा मध्यभाग हे वास्तूचे ब्रह्मस्थान असते. तिथे किंवा पूर्व दिशेला दाम्पत्यांची खोली नसावी. कारण बेडरूमच्या दृष्टीने ती दिशा अयोग्य आणि वादाला कारणी भूत ठरते. घराचा कोपरा हा बेडरूमसाठी योग्य मानला जातो. कारण तो बाहेरच्यांच्या नजरेपासून दूर आणि सुरक्षित राहतो त्यामुळे दाम्पत्य जीवनावर वाईट व नकारात्मक लहरींचा प्रभाव पडत नाही. 

Web Title: If you want to have a happy married life, make the changes in the bedroom architecture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.