आयुष्यात पश्चात्ताप टाळायचा असेल तर 'या' चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 01:45 PM2022-04-04T13:45:25+5:302022-04-04T13:45:44+5:30

काही लोकांशी घातलेले वाद आयुष्यभरासाठी त्रास देऊ शकतात. ते वाद टाळा असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहेत.

If you want to avoid guilt in life, avoid arguing with these four types of people! | आयुष्यात पश्चात्ताप टाळायचा असेल तर 'या' चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा!

आयुष्यात पश्चात्ताप टाळायचा असेल तर 'या' चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा!

Next

स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत, मूर्खांशी वाद घालणे म्हणजे मूर्खांची संख्या आणखी एकाने वाढवणे. किंवा आपले पूर्वजही नेहमी सांगत असत, चिखलात दगड मारून काय उपयोग? आपल्याच अंगावर शिंतोडे उडणार. म्हणून आवश्यक तिथे वाद जरूर घाला पण आचार्य चाणक्य यांच्या मते पुढील चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा, जेणेकरून भविष्यातील पश्चात्ताप टळेल. 

वादांपासून दूर राहणे नेहमीच चांगले, परंतु काही ठिकाणी हक्कासाठी, न्यायासाठी, सत्यासाठी आवाज उठवावाच लागतो. त्यामुळे वाद उद्भवतात. मात्र काही लोकांशी घातलेले वाद आयुष्यभरासाठी त्रास देऊ शकतात. ते वाद टाळा असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहेत.

आचार्य चाणक्याची धोरणे जीवनाच्या प्रत्येक बाबतीत कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त आहेत. मग ते जीवनात यश मिळवण्यासाठी असो, श्रीमंत होण्यासाठी असो, संकटातून बाहेर पडण्यासाठी असो किंवा संकटातून मुक्त होण्यासाठी असो. आचार्य चाणक्यांनी सांगितलेली धोरणे आजही तितकीच समर्पक आहेत. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जर तुम्हाला जीवनातील त्रास आणि पश्चात्ताप टाळायचा असेल तर पुढील चार प्रकारच्या लोकांशी वाद टाळा. 

मूर्ख व्यक्ती - आचार्य चाणक्य म्हणतात की, मूर्ख व्यक्तीशी कधीही वाद घालू नये. यातून तुमचा वेळ तर वाया जातोच पण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून ती व्यक्ती तुमची प्रतिमाही खराब करू शकते म्हणून मूर्ख व्यक्तीपासून अंतर ठेवणे चांगले.

मित्र- चांगला आणि खरा मित्र हा प्रत्येक सुख-दु:खाचा साथीदार असतो. जर तुम्ही त्याच्याशी वाद घातला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अतिशय प्रेमळ आणि विश्वासार्ह नाते गमावाल. तसेच जर एखादा मित्र तुमचा शत्रू झाला तर तो तुमची अनेक गुपिते उघड करून तुमचे मोठे नुकसान करू शकतो.

नातेवाईक - आई-वडील, भावंड, पत्नी किंवा मुलांशी कधीही वाद घालू नका. कारण छोट्याशा कारणापायी झालेला वाद आयुष्यभराचे नाते तोडू शकते. आणि ती चूक तुम्हाला आयुष्यभर दुःख देऊ शकते.

गुरू- जीवनात गुरुची भूमिका खूप महत्त्वाची असते. आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतो. आव्हानांना कसे सामोरे जावे हे स्पष्ट करते. तुम्हाला ज्ञान देते. म्हणून गुरूशी कधीही वाद घालू नका, अन्यथा गुरूंच्या कृपेपासून वंचित राहाल.

Web Title: If you want to avoid guilt in life, avoid arguing with these four types of people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.