आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रोज सकाळी उठल्यावर आणि झोपताना फक्त 'हे' सुविचार वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 03:08 PM2022-02-21T15:08:33+5:302022-02-21T15:09:14+5:30

हे सुविचार भिंतीवर मोठ्या अक्षरात चिकटवा आणि स्वतःसकट मुलांना मोठी स्वप्नं 'बघायला' आणि 'जगायला' शिकवा!

If you want to be successful in life, just read 'these' affirmation every morning when you wake up and go to bed! | आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रोज सकाळी उठल्यावर आणि झोपताना फक्त 'हे' सुविचार वाचा!

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रोज सकाळी उठल्यावर आणि झोपताना फक्त 'हे' सुविचार वाचा!

googlenewsNext

आजच्या तरुणांचे प्रेरणास्थान, व्याख्याता संदीप महेश्वरी यांनी एका व्हिडीओमध्ये २५ सुविचार सांगितले आहेत. ते सांगतात, हे सुविचार रोज सकाळी आणि उठल्यावर व झोपताना वाचा आणि त्यावर कृती सुरू करा, तुमचे आयुष्य अंतर्बाह्य बदलून जाईल असे तो म्हणतो. सुविचार लिहिण्याची आणि वाचण्याची सवय आपल्याला बालपणापासून आहे, पण ते अमलात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. सुविचाराचे पालन आपण व्यक्तिगत जीवनात न केल्याची मोठी किंमत चुकवत आहोत. निदान पुढच्या पिढीकडे योग्य आदर्श राहावा आणि त्यांनी आयुष्याचे सोने करावे असे वाटत असेल, तर पुढील सुविचार रोज त्यांच्याकडून श्लोक, पाढे म्हणवून घेता तसे म्हणवून घ्या. नक्की बदल घडेल. 

  • कामात एवढी गोपनीयता ठेवा, की जेव्हा यश मिळेल ते जगाला ओरडून सांगावे लागणार नाही, ते आपोआप सर्वांना कळेल!
  • ज्यांच्यामध्ये एकट्यांने चालण्याची क्षमता असते, एक दिवस जग त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालू लागते. 
  • यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, तर अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. 
  • ज्यांच्याकडून कोणालाच यशाची अपेक्षा नसते, असेच लोक अनपेक्षितपणे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचून दाखवतात. 
  • यश आणि अपयश आपल्या मानण्यावर आहे. अपयश पत्करले तर तुम्ही हरता आणि यश मिळवायचे ठरवले तर तुम्ही जिंकता!
  • जोपर्यंत तुम्ही स्वतःचे अपयश स्वीकारत नाही तोवर कोणीही तुम्हाला अपयशी ठरवू शकत नाही. 
  • तुम्ही जर सूर्यासारखे यशाने तळपत राहू इच्छित असाल तर आधी सूर्यासारखे जळायलाही शिका. 
  • स्वप्नं साकार करण्यासाठी शहाणपण नाही तर झपाटलेपण आवश्यक आहे. 
  • कोणतेही लक्ष्य निश्चयापेक्षा मोठे नाही. कोणतीही लढाई न लढताच सोडू नका. 
  • बाहेरच्या स्पर्धेला नाही तर मनुष्य स्वतःशी असलेल्या स्पर्धेला जास्त घाबरतो. 
  • पानगळती झाल्याशिवाय जशी नवपल्लवी येत नाही, तशी अपयश आणि संघर्षाशिवाय संधी येत नाही. 
  • वेळ कितीही वाईट असू द्या, पण एक ना एक दिवस आपलीही वेळ येतेच!
  • अपयशाचा, कडेलोटाचा क्षण सावरता आला, तर तुम्हाला जगात कोणीही तोडू शकत नाही एवढे तुम्ही कणखर बनता. 
  • इच्छेने काहीच बदलत नाही, मात्र निश्चयाने सर्व काही बदलू शकता. 
  • जेवढा मार्ग दिसतोय तेवढा प्रवास सुरू ठेवा, तिथे पोहोचल्यावर पुढचाही मार्ग आपोआप दिसू लागेल. 
  • प्रत्येक छोटा बदल मोठ्या बदलाची सुरुवात असते. 
  • बदल घडवण्याची सुरुवात तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सोडून स्वतःमध्ये बदल घडवू लागता. 
  • सुविचार वाचून बदल घडत नसतात, सुविचार अनुसरले, आचरणात आणले की बदल घडू लागतात. 
  • आयुष्यात पश्चात्ताप करणे सोडून द्या आणि असे ध्येय गाठा जिथे पाहून तुम्हाला सोडून दिलेल्यांना पश्चात्ताप होईल. 
  • जो चुकला नाही तो काहीच शिकला नाही. 
  • चुका होणे वाईट नाही, पण वारंवार एकच चूक करत राहणे वाईट आहे. 
  • सुंदर दिसणे महत्त्वाचे नाही, सुंदर बनणे महत्त्वाचे आहे. 
  • मान आणि कौतुक मागून मिळवण्याच्या गोष्टी नाहीत, त्या कमवण्याच्या गोष्टी आहेत. 
  • स्वप्नं ती नाहीत जी आपण झोपेत पाहतो, स्वप्नं ती आहेत जी आपली झोप उडवतात. 
  • आयुष्य समजून घ्यायचे असेल तर आयुष्यात मागे वळून बघा आणि आयुष्य जगायला शिकायचे असेल तर पुढे बघा. 

Web Title: If you want to be successful in life, just read 'these' affirmation every morning when you wake up and go to bed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.