आत्मविश्वास वाढवायचा असेल तर वास्तू आणि ज्योतिष शास्त्रात दिलेल्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 02:36 PM2022-03-24T14:36:33+5:302022-03-24T14:37:49+5:30

आत्मविश्वासाने केलेली कोणतीही गोष्ट यशस्वी होतेच, त्यासाठी या टिप्सचा दैनंदिन जीवनात उपयोग करा आणि लाभ घ्या!

If you want to increase self-confidence, the tips given in Vastu and Astrology will be useful to you! | आत्मविश्वास वाढवायचा असेल तर वास्तू आणि ज्योतिष शास्त्रात दिलेल्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील!

आत्मविश्वास वाढवायचा असेल तर वास्तू आणि ज्योतिष शास्त्रात दिलेल्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील!

googlenewsNext

यश आणि आत्मविश्वास या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आत्मविश्वास तेव्हाच वाढतो जेव्हा यश मिळते आणि यश तेव्हाच मिळते जेव्हा आत्मविश्वास असतो. मात्र अपयशाने या दोन्ही गोष्टी दुरावतात आणि बुडत्याचा पाय अधिकच खोलात शिरत जातो. म्हणून आपल्या प्रगतीसाठी आत्मविश्वास मिळवण्यावर भर दिला पाहिजे. आत्मविश्वास कशाने वाढतो? तर सुयोग्य नियोजनामुळे! योग्य निर्णयामुळे! त्यासाठी आपली मानसिक स्थिती शांत असावी लागते. यासाठी वास्तू शास्त्राने दिलेले उपाय अवश्य करून बघा, लाभ होईल!

>>वास्तुशास्त्रानुसार, तुमचा दिवाणखाना  उगवत्या सूर्याच्या किंवा धावत्या घोड्याच्या चित्राने सजवा. ते चित्र पाहून आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल आणि घरातील नकारात्मकताही दूर होईल. ज्याप्रमाणे उत्साहवर्धक गाणी आपला मूड छान करतात तशीच उत्साहवर्धक चित्रे आत्मविश्वास वाढवतात. 

>>वास्तूनुसार घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. घरात जेवढा जास्त प्रकाश तेवढी जास्त सकारात्मकता घरात प्रवेश करते. स्वच्छ प्रकाश, मोकळी हवा, ताजेतवाने वातावरण मन प्रसन्न ठेवते. त्यामुळे नकारात्मक विचारांचा निचरा होतो आणि आपसूकच आत्मविश्वास वाढतो. 

>>वास्तूनुसार घरामध्ये छोटेसे मत्स्यालय अर्थात फिश टॅंक ठेवा. ज्यामध्ये किमान दोन सोनेरी मासे असतील. त्यांना नियमित आहार देत राहा. 

याशिवाय तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही काही ज्योतिष उपाय देखील करून पाहू शकता. जसे की... 

>>पक्ष्यांना अन्न आणि पाणी पुरवल्याने आत्मविश्वास वाढतो असे मानले जाते. त्यामुळे घराच्या छतावर पक्ष्यांसाठी नियमित चारा ठेवावा आणि त्यात पाणी भरून ठेवावे.

>>आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याची पूजा करावी. ‘आदित्य हृदय स्तोत्र’ नियमित म्हणा. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्याने आत्मविश्वास वाढतो. 

>>सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा. शक्य झाल्यास नैसर्गिक ठिकाणी फिरायला जा. सकारात्मक उर्जेने भरलेल्या लोकांसोबत तुमचा वेळ घालवा आणि दुसऱ्यांना दोष देणाऱ्या नकारात्मक लोकांची सांगत टाळा. 

>>आपल्या क्षेत्राशी निगडित अभ्यासासाठी, सरावासाठी दिवसभरातला एक तास राखीव ठेवा. हा एक तास ब्रह्म मुहूर्ताचा अर्थात पहाटे ४-६ वेळेतील असेल तर उत्तम. ती वेळ तुम्हाला नवनवीन कल्पना देईल, ऊर्जा देईल, चिंतनाला वेळ मिळेल, निर्णय क्षमता वाढेल आणि या सर्व प्रक्रियेमुळे आत्मविश्वास वाढेल. 

Web Title: If you want to increase self-confidence, the tips given in Vastu and Astrology will be useful to you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.