नैराश्यावर मात करायची असेल तर 'ही' कविता तोंडपाठ करून टाका आणि काही दिवसांत फरक बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 07:00 AM2022-07-28T07:00:00+5:302022-07-28T07:00:02+5:30

कोण एखादा देवदूत येऊन आपले आयुष्य सावरेल या प्रतीक्षेत बसून राहाल, तर आपल्याच हातांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून घ्याल!

If you want to overcome depression, recite 'this' poem and see the difference in a few days! | नैराश्यावर मात करायची असेल तर 'ही' कविता तोंडपाठ करून टाका आणि काही दिवसांत फरक बघा!

नैराश्यावर मात करायची असेल तर 'ही' कविता तोंडपाठ करून टाका आणि काही दिवसांत फरक बघा!

Next

अलीकडे नैराश्य या शब्दाशी आपली वरचेवर गाठभेट होते. परंतु जो कामात मग्न असतो, त्याच्या आसपासही हा शब्द फिरकत नाही. ज्यांच्याकडे काम भरपूर असते पण करायची तयारी नसते, उत्साह नसतो अशा लोकांच्या मानगुटीवर नैराश्याचं भूत जाऊन बसतं. ते प्रयत्नपूर्वक हाकलून लावायचे असेल तर केवळ मोटिव्हेशनल व्हिडीओ बघून भागायचे नाही, तर स्वयंप्रेरणा जागृत ठेवण्यासाठी स्वतःला हटकणेही गरजेचे आहे. 

झाड अचल असते, आपण नाही. आपण आपल्या प्रगतीसाठी हात पाय मारू शकतो. दुसरे कोणी आपल्या मदतीला येईल याची वाट बघत बसाल तर आयुष्याची राख रांगोळी होईल आणि पश्चात्तापाशिवाय पदरात काहीच पडणार नाही. म्हणून स्वतःला सतत जागे करत राहा. त्यासाठी गीतकार तनवीर ग़ाज़ी यांच्या पुढील कवितेचाही आपल्याला आधार घेता येईल. ही कविता तोंडपाठ करून टाका आणि जेव्हा जेव्हा मरगळ येईल, तेव्हा ही कविता गुणगुणायला सुरुवात करा आणि आळस झटकून कामाला लागा. 

तू खुद की खोज में निकल
तू किस लिए हताश है,
तू चल तेरे वजूद की
समय को भी तलाश है

जो तुझ से लिपटी बेड़ियाँ
समझ न इनको वस्त्र तू 
ये बेड़ियां पिघला के
बना ले इनको शस्त्र तू

चरित्र जब पवित्र है
तो क्यों है ये दशा तेरी
ये पापियों को हक़ नहीं
कि ले परीक्षा तेरी

जला के भस्म कर उसे
जो क्रूरता का जाल है
तू आरती की लौ नहीं
तू क्रोध की मशाल है

चूनर उड़ा के ध्वज बना
गगन भी कंपकंपाएगा 
अगर तेरी चूनर गिरी
तो एक भूकंप आएगा

तू खुद की खोज में निकल
तू किस लिए हताश है,
तू चल तेरे वजूद की
समय को भी तलाश है

Web Title: If you want to overcome depression, recite 'this' poem and see the difference in a few days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.