तुमचे मूल दक्षिणेकडे तोंड करून जेवत असेल तर 'ही' काळजी अवश्य घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 02:56 PM2023-08-10T14:56:34+5:302023-08-10T14:56:53+5:30

दक्षिण दिशा ही अनेक कारणांनी त्याज्य मानली जाते, म्हणून लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे. 

If your child eats facing south then 'this' must be taken care of! | तुमचे मूल दक्षिणेकडे तोंड करून जेवत असेल तर 'ही' काळजी अवश्य घ्या!

तुमचे मूल दक्षिणेकडे तोंड करून जेवत असेल तर 'ही' काळजी अवश्य घ्या!

googlenewsNext

>> सागर सुहास दाबके

लहान मुलांच्या बाबतीत पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की मुलं जेवायला, अभ्यासाला जेव्हा बसतात तेव्हा न ठरवता, सहजच, दक्षिणेकडे तोंड करून बसतात. जी गोष्ट सहज घडते, शक्यतो तीच घातक असते. उपयुक्त, विधायक आणि अपेक्षित गोष्टी 'सहज' घडत नाहीत, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात. 

लहान मुले सहज भावाने दक्षिणेकडे तोंड करून बसतात, अभ्यास करतात, जेवतात ,पण त्याचा दुष्परिणाम देखील होतो,, पचन नीट होत नाही, लक्षात राहत नाही. उत्तम प्रकारे अन्नसेवन करून पचन व्हायला हवे असेल , वाचलेले-अभ्यासलेले लक्षात राहायला हवे असेल , चित्तवृत्ति- मनोधारणा स्थिर आणि लयबद्ध व्हायला हवी असेल तर उत्तम प्राधान्याने उत्तरेकडे आणि मध्यम प्राधान्याने पूर्व अथवा इशान्येकडे तोंड करून बसावे, जेवावे, वाचन करावे, अभ्यास करावा,, लिखाण करावे,, जप करावा, कोडे सोडवावे, इत्यादी. 

पाश्चात्य संस्कृतीत सुद्धा प्राधान्य क्रम असाच आहे, आधी उत्तर, मग पूर्व  मग पश्चिम आणि सर्वात शेवटी दक्षिण. म्हणजे , first North, second East, third West and fourth South. आद्याक्षरं बघितली तर N, E, W, S . म्हणजे NEWS . म्हणजे वार्ताहर वार्तांकन करताना आधी उत्तरेची बातमी सांगतो , मग पूर्वेची , मग पश्चिमेची आणि शेवट दक्षिणेची, असा संकेत असल्याने बातम्यांना NEWS म्हणतात. 

-ही एक अनुभूत गोष्ट आहे. रुबिक क्यूब सोडवण्याची टेक्निक ज्यांना समजली आहे त्यांच्यासाठी कदाचित दिशांचे प्राधान्य हे गौण असेल पण जो नवप्रवृत्त आहे अशा एकाने हा स्वानुभव सांगितला,, कि उत्तरेकडे तोंड करून बसलं तर पटापट puzzle सुटते आणि दक्षिणेकडे तोंड करून बसलं तर डोकंच काम करेना होतं. 

आपल्या धर्मशास्त्रात सर्व गोष्टी उदक्संस्थ अथवा प्राक्संस्थ म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या अथवा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या असाव्यात असे सांगितले आहे. चित्राहुती घालताना सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे अथवा दक्षिणेकडून उत्तरेकडे घालाव्यात. वाढप करताना दक्षिणेकडून उत्तरेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जावे. अन्न प्रोक्षण करताना देखील हाच नियम ।

सृष्टीनियमांशी ऐक्य साधून आपले जीवन अधिक सुखकर बनवण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वसुरींनी केला आहे. आपल्याला काहीच कष्ट करायचे नाहीयेत, केवळ त्यांनी सांगितलेलं आचरायचं आहे. 

Web Title: If your child eats facing south then 'this' must be taken care of!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य