हिंदू धर्मात प्रत्येक गोष्ट मुहूर्त पाहून केली जाते, त्याला शास्त्रीय आधार कसा आहे ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 04:54 PM2022-03-10T16:54:48+5:302022-03-10T16:58:49+5:30
अमेरिका, रशिया अंतराळयान अवकाशात सोडताना नियमितपणाने विशिष्ट तिथीलाच ते सोडतात. एका मुलाखतीत तसे स्पष्ट लिहिले होते, की ही प्रगत राष्ट्रेदेखील चतुर्थीच्या मुहूर्तावर अंतराळयान सोडतात. याचाच अर्थ ते देखील तिथीपालन करतात.
कालचक्र हे गोलाकार आवृत्त होत असते. त्यामुळे निसर्गात घडणाऱ्या घटना नियमित वेळेस पुनरावृत्त होत असतात. सूर्य-चंद्राची ग्रहण नियमित वेळी पुनरावृत्त होतात. त्यामुळेच त्यांच्या स्पर्श मध्य आणि मुक्तीच्या वेळा मिनिट सेकंदात पंचांगात अगोदर वर्तवल्या जातात व त्या बिनचूक अनुभवाला येतात. अमेरिकेत साठ वर्षांचे पंचांग अगोदर तयार करतात. म्हणजे साठ वर्षे त्या संदर्भाची गणिते अगोदर करून ठेवतात. रोजच सूर्य-चंद्राचे उदयास्त, समुद्राची भरती ओहोटी, रोज होणाऱ्या तिथी वर्ष वर्ष अगोदर छापून दिलेल्या असतात. तीन वर्षांनी येणारा अधिक मास, १८ वर्षांनी येणारे सिंहस्थ पर्व, कन्यागताचे पर्व नियमित काळानेत येत असते.
पूर्व मीमांसा शास्त्रात शुंना व उपवास या नावाने स्वतंत्र अधिकरण जैमिनीने लिहिले आहे. त्यात ते लिहितात काही कुत्रे नियमितपणे एकादशी तिथीलाच उपवास करतात. महिन्यातला एकच एकादशीचा दिवस कुत्र्याला बिनचूक कळतो. रानडुक्कर या प्राण्याला वर्षाच्या तीनशे पासष्ठ दिवसांपैकी एकच दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस बिनचूक समजतो. त्या दिवशी चंद्रदर्शन घडू नये, म्हणून रानडुक्कर सूर्यास्ताचे पूर्वीच खाडा करून त्यात आपले तोंड लपवून ठेवतो. त्यादिवशी शिकारीसुद्धा रानडुक्कराला मारीत नाहीत. इंद्रायणी तीरावर देहू आणि आळंदी आहे. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षाचे पंधरा दिवस देहूच्या डोहातील मासे आळंदीला जातात. ऋतूचे चक्र नियमित वेळेवर चालते. साराश सृष्टी संचालन नियमित वेळापत्रकानुसार चाललेले आहे. त्या त्या नैसर्गिक घटना त्या त्या काळी घडतात व त्या त्या कलांशावर नियमित पुनरावृत्त होत असतात.
तेव्हा या अशा कालांशावर एखादी घटना शुभफल देणारी ठरते तेव्हा तो कालांश म्हणजे सुमुहूर्त होय आणि ज्या कालांशावर एखादी घटना अशुभ घडते, तो कुमुहूर्त होय. कारण त्या त्या वेळी तसेच्या तसे फळ देण्यासाठी पुनरावृत्त होत असतात.हीच सुमूहुर्त आणि कुमुहूर्त यांची शास्त्रीय उत्पत्ती आहे.
अमेरिका, रशिया अंतराळयान अवकाशात सोडताना नियमितपणाने विशिष्ट तिथीलाच ते सोडतात. एका मुलाखतीत तसे स्पष्ट लिहिले होते, की ही प्रगत राष्ट्रेदेखील चतुर्थीच्या मुहूर्तावर अंतराळयान सोडतात. याचाच अर्थ ते देखील तिथीपालन करतात.