Indian Temple: भारतातील 'ही' अद्भुत मंदिरं पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल हे नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 01:52 PM2024-07-02T13:52:06+5:302024-07-02T13:52:23+5:30

Indian Temple: भारतातील प्राचीन मंदिरं ही केवळ अध्यात्म केंद्र नाही तर स्थापत्यकलेचा उत्तम नमूना आहेत, त्यांचे वैशिष्ट्य आणि अनोखेपण जाणून घेऊ!

Indian Temple: You will surely be amazed to see 'these' wonderful temples in India! | Indian Temple: भारतातील 'ही' अद्भुत मंदिरं पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल हे नक्की!

Indian Temple: भारतातील 'ही' अद्भुत मंदिरं पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल हे नक्की!

नाविन्याच्या शोधात आपण जगाचा प्रवास करतो, पण 'काखेत कळसा नि गावाला वळसा' हेच विसरतो. आपला देश वैविध्यतेने नटलेला आहे. त्यातही जुने स्थापत्यशास्त्र पाहण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. येथील पुरातन वास्तू आपली संस्कृती आणि इतिहास यांची साक्ष देतात. आजच्या प्रगत युगातील सुसज्ज यंत्रणेसह असलेल्या स्थापत्यकरांनाही हेवा वाटावा अशी ऐतिहासिक ठिकाणे भारतात आहेत. त्यावर सातत्याने संशोधन सुरु आहे. याचाच एक भाग म्हणजे प्राचीन मंदिरे. सुबक, सुंदर, आखीव, रेखीव मंदिरांना तत्कालीन स्थापत्यकारांनी, वास्तुविशारदांनी जो काही 'युनिक' टच दिलेला आहे, तो अवाक करणारा आहे. समाज माध्यमावर अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची यादी वाचनात आली, ती पुढीलप्रमाणे-

वर्षातून एकदाच सूर्यप्रकाश घेणारी मंदिरे:

१. नागलापुरम वेद नारायण स्वामी मंदिर
२. कोल्हापूर लक्ष्मी मंदिर
३. बंगलोर गावी गंगाधर मंदिर
४. अरिसेवेली सूर्य नारायण मंदिर
५. मोगलेश्वर
६. कोदंडरमा कडप्पा जिल्हा

सतत पाण्याचा प्रवाह असलेली मंदिरे

१. महानंदी
२. जंबुकेश्वर
३. रामलिंगेश्वर झरा
४. कर्नाटक कमंडला गणपती
५. हैदराबाद काशी बग्गे शिवालय
६. मल्लेश्वरम.. बंगलोर
७. राजराजेश्वर बेल्लमपल्ली शिवालय
८. सिद्धगंगा टुमकूर

मंदिरांना अखंड ज्योतीच्या रुपात दर्शन

१. ज्वालामुखी.. ज्वालादेवी
२. अरुणाचल ईश्वर
३. मंजुनाथ

चित्तथरारक कलहस्तेश्वर.

पूजेसाठी समुद्राच्या मागे जाणारे मंदिर
१. गुजरात निशकलंक महादेव
२. पुंगनूर शिवालय  जेथे 40 वर्षांतून एकदा, समुद्र जलपूजा आयोजित केली जाते.

देवीची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे 

१. आसाम कामाक्या देवी
२. केरळ दुर्गा माता

रंग बदलणारे मंदिर

१. अतिशया विनायक मंदिर  तामिलनाडू, जे उत्तरायण आणि दक्षिणायणासाठी एकदाच रंग बदलते.
२. गोदावरी पंचारा सोमेश्वर मंदिर, जे पौर्णिमेला पांढरे आणि अमावस्येला काळे होते.

सतत वाढणारी मूर्ती

१. कणिपकम
२. यागंती बसवण्णा
३. बसवानागुडी, बंगलोरचा बसवा
४. बिक्कावोलू लक्ष्मी गणपती

मंदिर जे ६ महिन्यातून एकदा उघडतात

१. केदारनाथ
२. बद्रीनाथ
येथे ६ महिने दार बंद करून दिवा लावला जातो.
३. गुह्या काली मंदिर

वर्षातून एकदा उघडणारे मंदिर

१. अमरनाथ मंदिर
२. हसनंबा मंदिर हसन..
इथे वर्षभर ठेवलेला प्रसाद खराब न होता ताजा राहतो.

बिजिली महादेव मंदिर  हिमाचल प्रदेश ज्यावर १२ वर्षांतून एकदा वीज पडते.

सुंदर कृष्ण मंदिर 

१. केरळ श्री कृष्ण मंदिर..
२. वृंदावनचा राधाकृष्ण

मंदिर जिथे पाण्यात दिवा लावतात : घड्या घाट माताजी मंदिर..

मंदिर जेथील देवता माणसाच्या भौतिक रूपासारखे दिसते 

१. हिमाचल नरसिंह मंदिर
२. इष्टा कामेश्वरी. श्रीशैला

सावली पहावी अशी मंदिरे 

१. छाया सोमेश्वर.. खांबाची सावली दिसते.
२. हम्पी विरूपाक्ष.. टॉवरची सावली विरुद्ध दिशेने उगवते..

पाण्यात वसलेले मंदिर 

१.नेपाळ विष्णू (हजार टन मूर्ती)
२. तिरुपती बालाजी
३. अनंता पद्मनाभ केरळ
४. रामेश्वर
५. कांस्य
६. चिलकुरी बालाजी
७. पंढरीनाथ
८. बदराचलम
९. अण्णावरम

जगन्नाथ पुरी मंदिराची वैशिष्ट्ये 

मंदिरावरुन पक्षी उडत नाहीत.
मंदिराचे आत समुद्राची गर्जना नाही.
कळस व घुमटाची सावली पडत नाही.
सुवासिक प्रसाद देवाला समर्पित..

कळस हलणारे मंदिर : आळंदी संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर पंढरपूरला पालखी निघते तेव्हा मंदिराचा कळस हालतो...

आपली भारतीय मंदिरे खूप वैशिष्ट्यपुर्ण आहेत. भारतीय खंडात हजारो खास मंदिरे आहेत. सदर माहिती वाचून तुम्हीसुद्धा या मंदिरांच्या पाहणीचा ध्यास घ्या आणि पुढच्या पिढीकडे हा समृद्ध वारसा हस्तांतरित करा!

Web Title: Indian Temple: You will surely be amazed to see 'these' wonderful temples in India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर