Indira Ekadashi 2024: पितृपक्षात येणार्‍या एकादशीचे आगळे वेगळे महत्त्व जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 11:00 AM2024-09-26T11:00:06+5:302024-09-26T11:01:42+5:30

Pitru Paksha 2024: पितृपक्षाच्या समाप्तीआधी पितरांच्या आत्म्याला मुक्ति देणारी एकादशी म्हणजे इंदिरा एकादशी, तिचे आणखी महत्त्व आणि व्रतविधी जाणून घ्या.

Indira Ekadashi 2024: Know the different significance of Ekadashi coming in Pitrupaksha! | Indira Ekadashi 2024: पितृपक्षात येणार्‍या एकादशीचे आगळे वेगळे महत्त्व जाणून घ्या!

Indira Ekadashi 2024: पितृपक्षात येणार्‍या एकादशीचे आगळे वेगळे महत्त्व जाणून घ्या!

एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी. दर महिन्यात ती दोनदा येते. दर एकादशीचे महत्त्वही आगळे वेगळे आहे. त्याचप्रमाणे २८ सप्टेंबर रोजी येणाऱ्या इंदिरा एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. 

पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी राखीव ठेवलेला असतो. या कालावधीत पितर आपल्या वंशजांची भेट घेण्यासाठी कोणत्या न कोणत्या स्वरुपात पृथ्वीवर अवतीर्ण होतात, अशी पूर्वापार श्रद्धा आहे. त्यांच्याप्रती ऋणनिर्देशन म्हणून श्राद्धविधी केला जातो. त्यामुळे पितर तृप्त होऊन वंशजांना भरभरून आशीर्वाद देतात. अशा या पुण्यसमयी एकादशीच्या व्रताची भर पडली तर दुग्दशर्करा योगच म्हटले पाहिजे. 

इंदिरा एकादशीच्या दिवशी, पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपासना आणि पूजा केली जाते.  ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष असतो, त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे. त्यामुळे पितृदोष दूर होऊन पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पुढील पिढीला कसलीही बाधा येत नाही. या दिवशी आपला उपास असला, परंतु पितरांची तिथ असेल तर पितरांना उपाशी ठेवू नये, तर श्राद्धाचा नैवेद्य करावा, काकबली वाढावा, गायीला, कुत्र्याला पान वाढावे आणि आपण एकादशीचा उपास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला कृष्णाला किंवा भगवान विष्णूंना फुल वाहून नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा. 

इंदिरा एकादशीची पौराणिक कथा : 

इंदिरा एकादशीच्या दिवशी पवित्र राजा इंद्रसेनने पितृ लोकात आपल्या वडिलांच्या उद्धारासाठी उपवास व पूजा केली होती. यामुळे त्यांना वैकुंठ लोक प्राप्त झाले. तेव्हापासून इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपास आणि पूजा करण्याचा नियम आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष आहे, त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे. पंचांगानुसार, या वर्षी इंदिरा एकादशीचा उपवास ०२ ऑक्टोबर, शनिवारी ठेवला जाईल. इंदिरा एकादशीच्या उपास आणि उपासनेची पद्धत जाणून घेऊया...

उपवास पद्धत :

इंदिरा एकादशीचे व्रत पितृ पक्षात येत आहे आणि त्याचा उपवास विशेषतः एखाद्याच्या मृत पूर्वजांच्या, पूर्वजांच्या उद्धारासाठी साजरा केला जातो. म्हणून इंदिरा एकादशीला इतर एकादशीच्या उपवासात विशेष स्थान आहे. त्याचे पारण द्वादशीच्या दिवशी केले जाते. इंदिरा एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न घ्यावे. एकादशीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. वरचेवर फराळ न करता ठराविक वेळी फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्न दान करून उपास सोडावा. 

Web Title: Indira Ekadashi 2024: Know the different significance of Ekadashi coming in Pitrupaksha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.