International Women's Day 2023: जागतिक महिला दिनानिमित्ताने जाणून घ्या आचार्य चाणक्यांनी महिलांसंबंधी केलेल्या ३ महत्त्वाच्या सूचना!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 11:00 AM2023-03-07T11:00:27+5:302023-03-07T11:01:32+5:30
International Women's Day 2023: ८ मार्च रोजी आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, मात्र आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले मुद्दे विचार करण्याजोगे आहेत!
महिलांचा आदर करण्याची बाब जवळपास प्रत्येक धर्मात आणि संविधानात सांगितलेली आहे. कारण स्त्रियांमध्ये भरपूर धैर्य, जिज्ञासा आणि संयम असतो. ही गोष्ट शेकडो वर्षांपूर्वी समजली होती, त्यामुळे प्रतापी राजांपासून ते ज्ञानी पुरूषांपर्यंत स्त्रियांच्या सन्मानाला प्राधान्य दिले गेले. थोर समाजशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनीही त्यांच्या धोरणात स्त्रियांबद्दल तपशीलवार विवेचन केले आहे. यासोबतच त्यांनी महिलांचा आदर आणि चारित्र्य गुणांबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
महिलांशी संबंधित या गोष्टी विसरू नका
आचार्य चाणक्य सांगतात की ज्या घरात शिक्षित, कर्तबगार आणि हुशार स्त्रिया असतात, अशा कुळाचा उत्कर्ष होतो. त्यांच्या कुटुंबामध्ये सदैव सुख आणि समृद्धी असते. त्यामुळे महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. कुटुंब आणि समाज घडवण्यात त्यांचा मोठा हात असतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि समाजाची प्रगती पहायची असेल तर महिलांबाबत या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
>> चाणक्य नीती सांगते की स्त्रियांना नेहमी आदर द्या. जो समाज महिलांचा आदर करत नाही तो कधीच प्रगतीशील होऊ शकत नाही कारण महिलांच्या योगदानाशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे.
>> अशिक्षित समाज कधीच प्रगती करू शकत नाही. या समाजातील निम्मी लोकसंख्या महिला असल्याने त्यांच्या शिक्षणाशिवाय हा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही.
>> स्त्री शिक्षित झाली पण तिच्या क्षमतेचा योग्य वापर केला नाही तर ती निरुपयोगी होईल. त्यामुळे प्रत्येक समाजाने महिलांच्या ज्ञानाचा त्यांच्या प्रतिभेचा योग्य उपयोग होईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी घरात आणि समाजात त्यांच्या बोलण्याला आणि कामाला महत्त्व दिले पाहिजे. त्यांना त्यांच्यातील कलागुण दाखवण्याची संधी दिली पाहिजे.
स्त्रियांना दुय्यम वागणूक देण्यापेक्षा त्यांचे विचार विचारात घेऊन काम केल्यास समाजाची निश्चितच प्रगती होईल.