International Yoga Day 2022: नियमित योगाभ्यासाने कुंडलीतले योग बदलणे शक्य आहे का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 07:00 AM2022-06-20T07:00:00+5:302022-06-20T07:00:02+5:30

International Yoga Day 2022: योग करण्याचा योग जुळून येणं फार कठीण. आळशी देहाला, मनाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग दिनापासून नियमित योगाभ्यास सुरू करा!

International Yoga Day 2022: Is it possible to change the horoscope yoga with regular yoga practice? | International Yoga Day 2022: नियमित योगाभ्यासाने कुंडलीतले योग बदलणे शक्य आहे का? जाणून घ्या!

International Yoga Day 2022: नियमित योगाभ्यासाने कुंडलीतले योग बदलणे शक्य आहे का? जाणून घ्या!

googlenewsNext

एखादी चांगली गोष्ट घडण्यात विलंब होऊ लागला की आपल्या घरातली मोठी माणसं लगेच म्हणतात, कधी योग येणारे काय माहीत! योग असा जुळून येतो की जुळवूनही आणता येतो? चला पाहूया... 

आपल्याकडे महागडा फोन असो नाहीतर कामचलाऊ, पण त्यात नेटवर्क नसेल, तर तो केवळ डब्बा आहे, बिनकामाचा! तसाच आपला देह निश्चल असेल, निष्प्राण असेल, अचेतन असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. त्या देहाला गरज आहे चैतन्याची. ते चैतन्य मिळते योगसाधनेतून! जोवर आपला स्वतःशी परिचय होत नाही, तोवर आपण जगाशी सख्य जोडूनही एकटेच राहतो. म्हणून स्वतःशी मैत्री करायची असेल, तर योगसाधनेला पर्याय नाही. म्हणून केवळ आजच्या दिवसापुरती योग साधना न करता आजपासून योग साधनेला प्रारंभ करा आणि ती दैनंदिन आयुष्यातील एक सवय बनवून घ्या. जेवण, झोप यांच्याइतकेच योगाभ्यासाचा महत्त्व द्या. शरीर उत्तम असेल, तर मन एकाग्र होईल आणि मन एकाग्र असेल तरच आंतरिक शक्तीची ओळख पटेल. 

लहान मुलांना आपण ओरडतो. एका जागेवर शांत बस. वास्तविक पाहता, मुले देहाने फिरत असतात, पण त्यांचे मन आत्मानंदाची, सहजानंदाची अनुभूती घेत असते. त्यामुळे ते मनाने स्थिर व देहाने अस्थिर असतात. याउलट मोठी माणसं देहाने जेवढी शांत दिसतात, त्याउलट ती मनाने सैरभैर फिरत असतात. अशा मनाला नियंत्रित करण्याचे सामर्थ्य योग साधनेत आहे. म्हणून रोज योगाभ्यास केलाच पाहिजे. 

योगाभ्यासाने अनेक परिणाम साध्य होतात. वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.

१) सर्व स्तरांवर तंदुरुस्ती 
२) वजनात घट 
३) ताण-तणावापासून मुक्ती 
४) आंतरिक शांतता 
५) रोगप्रतिकारक शक्तीत वाढ 
६) सजगतेत वाढ 
७) नाते संबंधात सुधारणा. 
८) उर्जा शक्तीत वाढ. 
९) शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते. 
१०) संयम वाढतो. 

हे सर्व फायदे लक्षात घेतल्यावर तुम्हालाच तुमचे उत्तर सापडले असेल. आपली ग्रहदशा बिघडली की वरील १० मुद्दे नशिबात असूनही खोडले जातात. याउलट योगाभ्यासाने हे दहा लाभ होत असतील तर कुंडलीत नसलेले योग जुळून यायला कितीसा अवधी लागणार आहे? यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनापासून योगाभ्यासाची आवड आणि सवय लावून घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा!

Web Title: International Yoga Day 2022: Is it possible to change the horoscope yoga with regular yoga practice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.