गर्वाची नशा उतरली, पंढरीच्या वारीत औषधं सापडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 02:57 AM2020-06-12T02:57:05+5:302020-06-12T02:59:05+5:30

चंद्रभानचा व्यवसाय खचत चालला होता. त्यावर बादलला अचानक पंढरपूरच्या वारीचा मार्ग चंद्रभानला यशाच्या गर्वावर औषध म्हणून सापडला.

The intoxication of pride subsided | गर्वाची नशा उतरली, पंढरीच्या वारीत औषधं सापडलं

गर्वाची नशा उतरली, पंढरीच्या वारीत औषधं सापडलं

Next

अतोनात कष्ट घेऊन चंद्रभान साध्या घरातून अलिशान फ्लॅटमध्ये आला खरा, पण यशाची नशा मात्र तो पचवू शकला नव्हता. फुकट्या मित्रांना घेऊन त्याच्या फ्लॅटवर रोज मद्याच्या पार्ट्या झाडू लागल्या. त्याला गर्व झाला होता आणि खूशमस्कऱ्या लोकांच्या गराड्यात तो सापडला, हे त्याच्या पत्नीच्या लक्षात आले होते. त्याच्या मित्रांमध्ये एक निर्व्यसनी बादल नावाचा मित्रही येत असे. तो चंद्रभानचा बालमित्र असल्याने गप्पा मारायला कधीतरी येत असे. त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की, चंद्रभान व्यवसायाकडे दुर्लक्ष करून व्यसनाधीन झाला आहे. त्याला त्याच्या बायकोची तडफड बघवत नव्हती. असा बराच काळ निघून गेला.

चंद्रभानचा व्यवसाय खचत चालला होता. त्यावर बादलला अचानक पंढरपूरच्या वारीचा मार्ग चंद्रभानला यशाच्या गर्वावर औषध म्हणून सापडला. चंद्रभानच्या बायकोला विश्वासात घेऊन त्याने वारीची कल्पना सांगितली. तिलाही कल्पना खूप आवडली. बादलने सुशिक्षित पण भाविक अशा दहा-बारा मित्रांचा ग्रुप करून त्यांना पंढरपूरच्या वारीसाठी तयार केले. हल्ली वारीला जाणं ही एक फॅशन झाली असल्याने चंद्रभानही स्वत:हून वारीला यायला तयार झाला. आषाढीच्या काळात वारी मार्गाला लागली. वारकऱ्यांचे लोंढे, पखवाज, वीणा, टाळ-मृदंग आणि हरिनामाचा गजर यांच्या गडगडाटी वातावरणात बेभान झालेल्या जनसमुदायात चंद्रभानही पार मिसळून गेला होता. त्याच्या क्षुल्लकशा अस्तित्वाचा त्याला हळूहळू विसर पडत चालला. संगत भव्य होती. खुजे जगणे म्हणजे काय, हे त्याच्या लक्षात येत होते. त्या सात दिवसांत चंद्रभान अंतर्बाह्य बदलला. चंद्रभानला आध्यात्मिक भान येऊ लागले होते. या सातही दिवसांत त्याला दारूची गरज लागली नव्हती. त्याची गर्वाची नशा आता पार उतरली होती. कारण येणाºया-जाणाºया वारकºयांना तो वाकून नमस्कार करत होता. बादलच्या कल्पनेला शेवटी यश आले होते.

Web Title: The intoxication of pride subsided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.