Iron Ring Uses: लोखंडी अंगठीच्या चुकीच्या वापराचे होऊ शकतात दुष्परिणाम; जाणून घ्या शास्त्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 14:30 IST2022-06-18T14:29:56+5:302022-06-18T14:30:17+5:30
Astrology: सगळेच धातू सगळ्या लोकांसाठी अनुकूल ठरतील असे नाही, यासाठीच आपलल्या कुंडलीतील ग्रहांना पाठबळ देतील अशाच धातूचा वापर केला पाहिजे. जसे की लोखंडी अंगठी!

Iron Ring Uses: लोखंडी अंगठीच्या चुकीच्या वापराचे होऊ शकतात दुष्परिणाम; जाणून घ्या शास्त्र!
शनीचा प्रभाव आणि साडेसातीचा प्रकोप टाळण्यासाठी लोखंडी अंगठी घातली जाते. यासोबत राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठीदेखील ही अंगठी घातली जाते. पण लोखंडी अंगठी प्रत्येकासाठी फायदेशीर ठरते असे नाही. काही लोकांसाठी, लोखंडी अंगठी फायद्याऐवजी नुकसान करते, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे. जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत लोखंडी अंगठी घालावी आणि कधी घालू नये.
लोखंडी अंगठी का आणि कशी घालायची?
>>राहू-केतू आणि शनीच्या वाईट प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी, ज्योतिषी लोखंडी अंगठी घालण्याची शिफारस करतात. पुरुषाने उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालावी. कारण शनीचे क्षेत्रफळ मधल्या बोटाखाली असते. तथापि, विशेष परिस्थितीत, ती डाव्या हाताच्या मधल्या बोटात देखील परिधान केली जाऊ शकते. याशिवाय शनिवारी संध्याकाळी लोखंडी अंगठी घालणे नेहमीच शुभ असते. लोखंडी अंगठीचा वापर शनिवारी सुरु करणे लाभदायक ठरते. रोहिणी, पुष्य, अनुराधा आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्रात लोखंडी अंगठी घालणेदेखील शुभ मानले जाते.
>>कुंडलीत शनि स्वस्थानात असल्यास. तसेच बुध, शुक्र आणि सूर्य एकत्र असल्यास लोखंडी अंगठी घालणे हानिकारक ठरते. अशा वेळी फक्त चांदीची अंगठी घालणे शुभ ठरते. याउलट राहु आणि बुध जर कुंडलीत मजबूत स्थितीत असतील तर लोखंडी अंगठी घालणे शुभ असते.
>>कुंडलीच्या बाराव्या घरात बुध आणि राहू एकत्र किंवा स्वतंत्रपणे परंतु दुर्बल ग्रहस्थितीत असल्यास अंगठीऐवजी मनगटात लोखंडी कडे धारण करावे. कुंडलीचे १२ वे घर राहूचे असते. अशा स्थितीत राहूच्या शुभ परिणामांसाठी लोखंडी अंगठी घातली जाऊ शकते.
>>ही माहिती ज्योतिष शास्त्राशी निगडित असल्याने त्याचे अवलोकन होणे आपल्याला थोडे कठीण वाटेल. मात्र परिणाम जाणून न घेता लोखंडी अंगठीचा वापर केला तर प्रकृती, परिस्थिती आणि मनस्थितीवर दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठीच लोखंडी अंगठी घालताना ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.