कुटुंबात वरचेवर होणाऱ्या वादाला घरात लावलेली 'ही' चित्र तर बाधक ठरत नाहीयेत ना? तपासून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 03:28 PM2021-11-24T15:28:44+5:302021-11-24T15:29:26+5:30

तुमच्या घरात सुख-शांती राहावी असे वाटत असेल तर घरात काही वस्तू कधीही आणू नका. अशा गोष्टी आणल्याने कौटुंबिक त्रास तर वाढतोच पण तुम्ही दारिद्रयातही लोटले जाऊ शकता.

Isn't this 'picture' in the house a hindrance to the most frequent disputes in the family? Check it out! | कुटुंबात वरचेवर होणाऱ्या वादाला घरात लावलेली 'ही' चित्र तर बाधक ठरत नाहीयेत ना? तपासून पहा!

कुटुंबात वरचेवर होणाऱ्या वादाला घरात लावलेली 'ही' चित्र तर बाधक ठरत नाहीयेत ना? तपासून पहा!

googlenewsNext

अनेकदा तुम्ही घरात काही नवीन वस्तू खरेदी करता आणि काही दिवसांनी अचानक कुटुंबात कलह सुरू होतो, असा अनुभव घेतला आहे का? हसतं, खेळतं, आनंदी कुटुंब एकएक वादाच्या भोवऱ्यात अडकते आणि कुटुंबाची उतरती कळा सुरू होते. यालाच वास्तू दोष म्हणतात. हे दोष घरातील अनावश्यक वस्तूंमुळे देखील निर्माण होऊ शकतात. 

शस्त्रांचे फोटो लावू नका 

तलवार, चाकू, भाला, बंदूक, तोफ अशा युद्धभूमीवर वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचे फोटो घरात लावू नका. त्यामुळे मनात हिंसक विचार येतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची शांतता भंग पावते आणि घरगुती कलह वाढतो. ही चित्रे वारंवार पाहून तुमचा स्वभाव संतप्त होतो, या उद्विग्न मनस्थितीमुळे वाद विकोपाला जाऊ शकतात. त्यामुळे अशी चित्रे घरात कधीही आणू नयेत.

ताजमहालाचे चित्र किंवा मूर्ती ठेवू नका. 

बरेच लोक आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी ताजमहालचे फोटो लावतात. असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. खरं तर, ताजमहाल ही मृतदेहावर बांधलेली समाधी आहे, ज्याला वास्तुशास्त्रात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. या चित्रातून पती-पत्नीमधील प्रेम वाढण्याऐवजी अंतर वाढवण्याचा विचार मनात येतो. त्यामुळे या चित्राला घरात कधीही स्थान देऊ नये.

गूढ फोटो लावणे टाळा 

काही लोक सर्जनशीलतेच्या नावाखाली आपल्या घरात भूत किंवा रहस्यमय ठिकाणांची छायाचित्रे लावतात. या कल्पनेला नाविन्य असे नाव दिले जाऊ शकते, परंतु सत्य हे आहे की घरात नकारात्मक ऊर्जा संचारू लागते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य विचित्र त्रासात अडकू लागतात. जे घरात राहणाऱ्या लोकांसाठी वेदनादायी आहे. त्यामुळे तुमच्या घरातही असे चित्र असेल तर ते लगेच काढून टाका.

महाभारताचे चित्र लावणार असाल तर... 

घरामध्ये महाभारताशी संबंधित चित्र कधीही लावू नका. वास्तविक महाभारत हे कौटुंबिक युद्ध होते, जे कौरव आणि पांडव यांच्यात झाले होते. महाभारतातील चित्र कुटुंबातील संघर्षाची भावना वाढवते. वास्तुशास्त्रानुसार महाभारताचे चित्र घरातील सुख-शांतीमध्ये बाधक आहे. त्यामुळे त्याला घरात स्थान देणे टाळले पाहिजे. त्यामुळे चित्र लावायचेच असेल तर कृष्ण आणि अर्जुनाचे लावा. परंतु रणभूमीचे नको. 

Web Title: Isn't this 'picture' in the house a hindrance to the most frequent disputes in the family? Check it out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.