घराबाहेर पडताना 'या' गोष्टी दिसणे ठरते लाभदायक, जाणून घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 09:00 AM2021-07-21T09:00:00+5:302021-07-21T09:00:02+5:30
खास कामानिमित्त घराबाहेर पडताना या गोष्टी दिसल्या तर समजून जा, काम झाल्यात जमा आहे.
शुभ मुहूर्तामध्ये केलेल्या कामाचा परिणाम चांगला मिळतो त्याच प्रकारे महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना अचानक काही गोष्टी समोर येतात. त्या गोष्टी दिसणे लाभदायक ठरू शकते. धर्मपुराण, ज्योतिष इत्यादींनी एखाद्या व्यक्तीला त्याच्या भविष्यात घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी अनेक मार्ग दिले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील घटना देखील त्याच्या जीवनाचे संकेत देतात. आज त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
एखादी व्यक्ती दिवसभरात बर्याच वेळा घराबाहेर पडते, परंतु काहीवेळा अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणे होते. अशा वेळेस कोणत्या गोष्टी दिसणे लाभदायक ठरते ते पहा-
>> आपण घराबाहेर पडताना पाण्याने भरलेले भांडे पाहणे फार चांगले आहे.
>> लग्न, प्रवास इत्यादीसारख्या काही महत्त्वाच्या शुभ कार्यासाठी बाहेर जात असाल आणि गाय आपल्या वासराला दूध देत असताना दिसणे खूप शुभ समजले जाते.
>> घराबाहेर पडताना कोणाला अचानक शिंक आली तर ते अशुभ मानले जाते, परंतु एकामागोमाग एक दोनदा शिंका येणे शुभ मानले जाते.
>> बर्याच वेळा आपले लक्ष सभोवतालच्या गोष्टींकडे जात नाही, परंतु आपण घर सोडताच मंदिराची घंटा ऐकली तर आपल्याला नक्कीच कामात यश मिळेल, असे म्हणतात.
>> आपण घर सोडताच वाटेत भिकारी दिसल्यास त्याला काही पैसे दान करा. हे आपल्या कर्जाच्या ओझे संपण्याचे चिन्ह आहे.
>> घराबाहेर पडताना फुले किंवा फुलांचा हार पाहणे देखील चांगले आहे. हे सांगते की तुमच्या आयुष्यात काही शुभ प्रसंग येत आहेत. त्याचप्रमाणे सुपारी पान पाहणे देखील खूप शुभ आहे.
>> तळ्यात मासे दिसणे किंवा हत्तीची स्वारी दिसणे अतिशय शुभ मानले जाते. शहरात हत्ती दिसणे दुर्मिळ, तरीदेखील जर कधी दिसलाच तर हे शुभ लक्षण आहे असे समजा.