'या' शुभ मुहूर्तांवर गृह प्रवेश केलात तर तो ठरेल अधिक लाभदायी; जाणून घ्या वर्षभरातले शुभ मुहूर्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 02:44 PM2022-01-08T14:44:33+5:302022-01-08T14:45:13+5:30
शास्त्रानुसार शुभ मुहूर्त आणि शुभ तिथीला नवीन घरात प्रवेश करणे शुभ असते. शुभ मुहूर्तावर गृहप्रवेश केल्याने त्या घरात राहणाऱ्या लोकांचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरलेले असते. तुम्ही सुद्धा गृह प्रवेशाच्या तयारीत असाल, तर हा लेख नक्की उपयोगी पडेल.
आपण भारतीय प्रत्येक शुभ कार्य शुभ मुहूर्तावर करतो. काही बुद्धीवादी किंवा तथाकथित पुरोगामी लोकांना मुहूर्त बघणे गौण वाटते. परंतु शुभ मुहूर्त पाहणे म्हणजे नेमके काय? तर आपण सुरू करत असलेल्या शुभ कार्याला ग्रहस्थितींचे पाठबळ आहे की नाही हे तपासणे. ग्रहस्थिती अनुकूल असेल तर तिच्या प्रकाशरूपी किरणांनी आपल्या आयुष्यावर तसेच निसर्गावर अनेक परिणाम साधतात. पूर्वी हवामान खाते, दिनदर्शिका नसल्याने पंचांग हेच परिस्थितीची अनुकूलता ताडून पाहण्याचे माध्यम होते. तसेच आजवरच्या ज्योतिषांच्या सखोल अभ्यासामुळे या शास्त्राची प्रचिती देखील लोकांना येत असे.
माणसाला स्वतःचे घर असावे असे वाटते. पै-पै जोडून स्वप्नातले घर साकारतात. वास्तू बांधून किंवा खरेदी करून प्रवेश करण्यास योग्य झाली, की शुभ मुहूर्त पाहून वास्तूचे गणेश पूजन तसेच गृहप्रवेश करून घेतात. आपल्या घराला देवाब्राह्मणांचे, नातलगांचे, सगे सोयऱ्यांचे आशीर्वाद लाभावेत आणि आपले घर सुख समृद्धीने परिपूर्ण व्हावे, या विचाराने लोक शुभ मुहूर्तावर गृह प्रवेश करतात. यासाठीच २०२२ या वर्षातील गृह प्रवेशाचे शुभ मुहूर्त देत आहे.
जानेवारी महिन्यात गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त नाही.
फेब्रुवारी - ५, ६, १०, ११, १८, १९, २१
मे - २, ११, १२, १३, १४, १६, १७, २०, २५ आणि २६
जून - १, १०, ११, १६, २२ आणि २३
डिसेंबर - २, ३, ४, ८ आणि ९
चातुर्मासाच्या काळात नवीन घरात प्रवेश निषिद्ध मानला जातो. अर्थात त्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तसेच पौष महिन्यातही नवीन घरात प्रवेश करणे शुभ नाही. हे महिने वगळता मंगळवारच्या दिवशीदेखील गृहप्रवेश टाळावा.
शास्त्रानुसार शुभ मुहूर्त आणि शुभ तिथीमध्ये घरात प्रवेश करणे शुभ असते. तसेच त्या घरात राहणाऱ्या लोकांचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरलेले असते. अशा परिस्थितीत जर तुम्हीही तुमच्या स्वप्नातील घरात प्रवेश करण्यासाठी शुभ मुहूर्त शोधत असाल तर वरील तारखा शुभ ठरतील.