Jagannath Rathayatra 2024: श्रीकृष्ण, बलराम, सुभद्रा आषाढात त्यांच्या मावशीकडे जातात; त्यासाठी हा रथोत्सव!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 02:14 PM2024-07-06T14:14:03+5:302024-07-06T14:14:32+5:30
Jagannath Rathyatra 2024: जगन्नाथाच्या रथयात्रेत त्या रथाला स्पर्श करता यावा म्हणून लाखो भाविक जमतात; पण हा रथ जातो कुठे? वाचा ही भावपूर्ण रोचक माहिती.
>> योगेश काटे, नांदेड
७ जुलै रोजी आहे आषाढ शु.द्वितीया जगन्नाथाची रथयात्रा. प्रभु त्यांच्या भावंडांना समेवत ( सुभद्रा,बलराम) रथात बसुन त्यांची मावशी गुंडाची यांच्या घरी जातात. वटपौर्णिमेनंतर ओरीसात जेष्ठी पौर्णिमेला स्नान पौर्णिमा असे म्हणतात. नंतर प्रभु आजारी पडतात स्थानिक भाषेत सांगायचे म्हणजे 'भगवान को बुखार आ गया' म्हणून पंधरा दिवस दर्शन बंद असते. या दिवसात भोग प्रसाद मात्र अखंड चालु असते. या पंधरा दिवसात प्रभुंच्या दर्शन होत नाही, मात्र जे यात्रेकरु बाहेरील राज्यातील त्यांना या प्रथेचे कल्पना नसते त्यासाठी प्रभुंचे दर्शनाचे पुण्य मिळावे म्हणून जगन्नाथ प्रभु चर्तुभुज रुपात पुरीपासुन पंचवीस किलोमीटर अंतरावर अल्लारनाथ म्हणून विराजमान आहेत. या पंधरा दिवसानंतर प्रभुंचे दर्शन प्रतिपदेस फक्त अर्चकांना होते. तद्नंतर हे विग्रह रथात विधवत ठेवले जातात.
मुख्य गर्भगृहात हे विग्रह शालिग्रामावर स्थापित आहे. मंदिराला मुख्य चार द्वार आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. मंदीरात जवळपास शंभराच्या आसपास मोठी छोटी पौराणिक पार्श्वभूमी लाभेली मंदीरे आहेत. मग त्यात नरसिंह ,सुर्य दधिवमान, भगवती तसेच श्रीकृष्णाचे मंदिर आहे.
तिथे एक विशिष्ट लोकप्रथा आहे : तिथे एकादशी मातेचे हि मंदीर आहे. या मंदिराची लोक कथाच वेगळी आहे. तेथील स्थानिकांकांकडून कळले ते असे-
चारधाम पैकी पुरी एक धाम आहे भगवंत येथे फक्त भोग (नैवैद्य ग्रहण करतात ) मग एकादशी असो की महाशिवरात्री भगवंतास खिचडीचा भोग होतोच. सर्व व्रतात सर्व श्रेष्ठ व्रत एकादशी मग तो तो कोणत्याही पंथाचा का असेना अगदी शैव शाक्त गाणपत्य एकादशी करणे अनिवार्य अस शास्त्रमत आहे. वैष्णांमध्ये प्रश्नच येत नाही .या एकादशीस गर्व आला भगवंताने खडसावून सांगितले "माझ्या प्रसादाशिवाय सर्वश्रेष्ठ काहीच नाही" मी पुरी येथे भोग खाण्यासाठीच आलोय त्यामुळे येथे एकच व्रत माझा प्रसादच सर्व श्रेष्ठ. म्हणून स्थानिकांच्या मतानुसार दर एकादशीस भगवंतास नैवेद्य दाखवला जातो. पुरी येथे असल्यास एकादशी महाशिवरात्र असली तरी भगवंताचा प्रसाद ग्रहण करा .या तीर्थक्षेत्राचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे कारण प्रभुची लीलाच काही वेगळी आहे. प्रभुचरणाजवळ स्थान हवे तर अहंकार व दंभ बाजुला सारल्याशिवाय शक्य नाही.
तसेच अशा विविध लोक कथा मंदिराशी जोडुन आहेत. पुरीचे तीन जगदविख्यात मंदीरे एक बाट मंगला देवी पुरीचे ग्राम दैवत दुसरे आद्य शंकराचार्य स्थापित गोवर्धन मठ व तिसरे पुरीपासून 30 कि.मी अंतारवर असलेले साक्षी गोपालचे मंदीर. आधी बाट मंगला देवी पुरी येथील लोक कथेनुसार अस मानतात, की जेंव्हा ब्रम्हदेव जगाची निर्मिती करण्याआधी थोडे संभ्रमित झाले तेंव्हा त्यांचा संभ्रमितपणा आदीशक्तीने लक्षात आणुन दिला तद्नंतर तो संभ्रमितपणा महाप्रभुंनी दुर केला व जगनिर्मितीस सुरुवात झाली. ही पुरीची ग्रामदेवी हसमुख पद्मासनातील आहे. विग्रह रथाचे प्रत्येक लाकुड देवीसमोर ठेवुनच रथ बनवला जातो व हिच्या दर्शनाशिवाय पुरीयात्रा संपूर्ण होत नाही.
दुसरे साक्षीगोपला मंदिर. आपल्या यात्रेची साक्ष साक्षीगोपाल या मंदिरात देतो असा स्थानिक मानस भक्तांना मध्ये आहे. आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेला गोवर्धन मठ हा मंदिरापासून बराच दुर आहे स्वर्गद्वार बाजार म्हणून या ठिकाणी शांत परिसर गोवर्धन मुरलीधराची काळीकुळकुळीत अशी प्रसन्न मुर्ती हि आद्य शंकराचार्य यांनी स्थापना केली तसेच समोर अर्धनारीनटेश्वरीची स्थापना आद्यशंकराचार्य यांनी केली. वर विमबला देवी शक्ती पीठ आहे एका आख्याईकेनुसखर सतीची नाभि येथे पडली, त्या अवशेषाचे हे मंदिर मानले जाते.
अशा यात्रेत सहभागी होण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी येतात. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी ही अनुभूती अवश्य घ्यावी. जय जगन्नाथ