Jagannath Yatra: पुरीच्या जगन्नाथाला एकादशीच्या दिवशीसुद्धा भाताचा नैवेद्य चालतो; वाचा त्यामागील कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 12:18 PM2024-07-08T12:18:54+5:302024-07-08T12:19:21+5:30
Jagannat Yatra: एकादशीला भात खात नाहीत हे आपण जाणतोच, तरी जगन्नाथाला भातही चालतो.
>> योगेश काटे, नांदेड
आपल्या हिंदुंच्या धार्मिक तीर्थ यात्रेत सुद्धा राष्ट्रप्रेमाची भावना किती मुळापासून आहे चारधाम, सप्त पुरी, बारा ज्योतिर्लिंग, शक्तीपीठांची ही यात्रा धर्मिकतेसोबत राष्ट्रवादाची सांगड घातली ती अशी! पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत तर उत्तर पासून दक्षिणेपर्यंत! याठिकाणी महाप्रभुंच्या अद्भुत पुरी क्षेत्रातील काही अद्भुत बाबींबद्दल स्थानिक मान्यतेनुसार व स्थलपुराणानुसार माहिती देत आहे.
पुरी हे वैष्णवांचे महास्थान! वैष्णवात वा आपल्या शास्त्रात एकादशीला फार महत्व आहे. एकादशीचे महत्त्व सांगणारा युधिष्ठीर व भगवंतामधला संवाददेखील आहे. शैव असो की वैष्णव, एकादशी हे सर्वांसाठी मोठे व्रत आहे. मात्र महाप्रभुंना व पुरी क्षेत्रात एकादशीला पूर्ण नैवेद्य भगवंतास दाखवतात. मग महाशिवरात्री असो की बाकी कोणता उपवास असो बारा महिने भगवंतास नैवेद्य असतो. एकादशी व्रतात मुख्य अन्न भात हे वर्ज्य आहे बाकी एकादशी करण्याचे प्रकार प्रत्येकाचे वेगळे आहेत. या पाठीमागे काही तर कारण असलंच पाहिजे. जेंव्हा पुरीला गेलो तेथे एका गौडीय मठात थांबलो होतो तेथे या घटनेची माहिती गोडीय भक्ताने सांगितली.
ब्रम्हदेव हे महाप्रभुंच्या नामस्मरणात एवढे दंग होत असत, की ते तहानभुक हरखून जात असत. पुरीत असतानाही तसेच झाले. थोड्या वेळाने ते भानावर आले. बघतात तर काय? नामस्मरण करताना आपण भगवंतास नैवेद्य दाखवायचा विसरलो. त्यांनी लगेच पाकसिद्धी केली, नैवद्य दाखवला व पुन्हा नामस्मरणात दंग झाले. आणि पुन्हा त्या भावनेचा आवेग कमी झाला व भगवंतांस अर्पण केलेला प्रसाद घ्यावा म्हणून नैवेद्य पात्रावर नजर टाकली. तर तेथे एक श्वान तो पातल्यातील नैवेद्य खात होता. त्याने भात सोडून सगळ्या पातेल्यातले अन्न खाल्ले. महाप्रभूंना नंतर लक्षात आले की अरे आज एकादशी आहे. महाप्रभु क्षमा याचना करु लागेल. प्रभु प्रगटले व प्रसन्न झाले व ब्रम्हदेवास म्हणाले, तुझी भक्ती पाहुन मी प्रसन्न झालो. या पुरी क्षेत्रात एकादशी व कोणतत्याऐ व्रताच्या दिवशी मला भाताचा नैवेद्य दाखवला तरी तो मी ग्रहण करेन व महाप्रभु गुप्त झाले.
तात्पर्य भगवंत भावाचा भक्तीभावाचा भुकेला आहे . परामार्थात भगवंताला दंभ अवडंबर आणि अहंकार आजिबात चालत नाही
जय जगन्नाथ
ll श्रीकृष्णार्पणमस्तु ll