Jivati 2024: आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार; त्यानिमित्त सवाष्ण तथा देवीची 'अशी' भरा ओटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:28 PM2024-08-30T13:28:04+5:302024-08-30T13:28:46+5:30

Jivati 2024: यंदाच्या श्रावण मासातील जिवतीचा शेवटचा शुक्रवार, देवीला नैवेद्य दाखवण्याबरोबर ओटी का आणि कशी भरावी तेही जाणून घ्या. 

Jivati 2024: Today is the last Friday of Shravan; On that occasion, follow the ritual in respect of lord devi | Jivati 2024: आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार; त्यानिमित्त सवाष्ण तथा देवीची 'अशी' भरा ओटी!

Jivati 2024: आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार; त्यानिमित्त सवाष्ण तथा देवीची 'अशी' भरा ओटी!

श्रावणातल्या शुक्रवारी (Shravan Shukravar 2024)सवाष्ण स्त्रीला तसेच एखाद्या लेकुरवाळ्या स्त्रिची ओटी भारतात, तिला जिवतीची (Jivati 2024) सवाष्ण म्हणतात. आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार आहे. जर एखादी सवाष्ण मिळाली नाही तर प्रसंगी देवीची ओटी भरली तरी चालते. नव्हे तर तसे करणे हाही देवीच्या उपासनेचाच एक भाग आहे. 

पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे, हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संततीप्राप्त व्हावी, म्हणून तिची ओेटी भरली जाते. 'संततीप्राप्ती'च्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते. आज श्रावणातली जिवतीची पूजा, यानिमित्त देवीची ओटी कशी भरतात ते पाहू. 

देवीची ओटी भरताना पाळावयाचे शास्त्र :

देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो. देवीला सहावारी ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असते. तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी. देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात. त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे. श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी.

आईचा जोगवा अर्थात आईचा आशीर्वाद : 

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह
महिषासूर मर्दना लागुनी ।
त्रिविध तापाची कराया झाडणी ।
भक्तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥
आईचा जोगवा जोगवा मागेन । 
द्वैत सारुनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन । 
भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा ।
करुनी पोटी मागेन ज्ञानपात्रा।
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । 
दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥
पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी । 
अद्भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥
आता साजणी जाले मी नि:संग । 
विकल्प नवऱ्याचा सोडियला संग ।
कामक्रोध हे झोडियेले मांग ।
केला मोकळा मारग सुरंग ॥५॥
ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।
जाउनी महाद्वारी नवस फेडिला ।
एकपणे जनार्दन देखिला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥

Web Title: Jivati 2024: Today is the last Friday of Shravan; On that occasion, follow the ritual in respect of lord devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.