डोकं शांत ठेवण्यासाठी फक्त एकदा 'ही' एक कृती अवश्य करून बघा! - संदीप महेश्वरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 11:42 AM2021-12-28T11:42:17+5:302021-12-28T11:42:40+5:30

कल्पना आणि वास्तव यातला भेद अन्य कोणी नाही, तर आपणच आपला दूर करायला शिकलो, तर क्षणात डोकं शांत ठेवायला शिकू शकता. कसे ते पहा-

Just try this 'this' once to keep your head calm! - Sandeep Maheshwari | डोकं शांत ठेवण्यासाठी फक्त एकदा 'ही' एक कृती अवश्य करून बघा! - संदीप महेश्वरी

डोकं शांत ठेवण्यासाठी फक्त एकदा 'ही' एक कृती अवश्य करून बघा! - संदीप महेश्वरी

googlenewsNext

आजच्या काळात आपण संयम गमावून बसलेलो आहोत. प्रत्येक गोष्ट क्षणार्धात मिळवण्याची सवय आपल्याला लागली आहे. कधी इंटरनेट बंद पडले, फोन लागला नाही, जेवणाची ऑर्डर वेळेत आली नाही, तरी लोक जमदग्नीचे रूप धारण करतात. एकूणच रागावर संयम राहिलेला नाही. सतत काहीतरी गमावण्याची भीती मनाला पोखरत राहते. या भीतीतून स्वत:ला सावरायचे कसे आणि क्षणार्धात डोकं शांत कसे ठेवायचे, याबद्दल सांगताहेत तरुणांचे लाडके व्याख्याते संदीप महेश्वरी!

आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचार सुरू असतात. आपल्या मेंदूला कल्पना आणि वास्तव यातला फरक स्पष्ट करता येत नाही. कल्पनेतून, अतिविचारातून निर्माण झालेल्या गैरसमजांना आपला मेंदू वास्तव समजू लागते आणि ते चिंताग्रस्त राहते. कल्पना आणि वास्तव यातला भेद अन्य कोणी नाही, तर आपणच आपला दूर करायला शिकलो, तर क्षणात डोकं शांत ठेवायला शिकू शकता. कसे ते पहा-

आपण सगळेच जण झोपेत स्वप्न पाहतो. स्वप्नात रंगून जातो. काही स्वप्नं आनंद देणारी तर काही भयभीत करणारी असतात. कधी कधी तर आपण आपला किंवा आपल्या आप्तजनांचा मृत्यू पाहतो. पटकन जाग येते. सर्वांगाला घाम फुटलेला असतो. पण क्षणात लक्षात येते आणि हायसे वाटते, की ते स्वप्नं होते. वास्तव नाही. वास्तवात आपण किंवा स्वप्नात मृत पाहिलेली व्यक्ती जीवंत आहे. या विचाराने आपण आनंदून जातो.

हीच कृती आपल्याला जागेपणी करायची आहे. एखाद्या गोष्टीची भीती जेव्हा मनात तयार होते. तेव्हा एक क्षण थांबून आपल्याला विचार करायला हवा, की ही केवळ आपली कल्पना आहे की वास्तव? एखाद्या कामात, नात्यात, आर्थिक व्यवहारात, स्पर्धेत आपण अपयशी ठरलो, याचा अर्थ आपण आयुष्यातून उध्वस्त होतो का? तर नाही! ही केवळ आपली कल्पना आहे. त्यात किती वेळ अडकून राहायचे? जेवढा वेळ आपण स्वप्न विसरायला लावतो, तेवढाच! अपयश, आळस झटकून पुन्हा कामाला लागलो, तर कोणीही आपल्याला यशस्वी होण्यापासून अडवू शकत नाही. 

हीच बाब राग नियंत्रणाची! एखाद्यावर रागवताना क्षणभर थांबून विचार करा आणि मग व्यक्त करा. खरोखरच नुकसान होण्याइतकी काही गोष्ट घडली आहे का? ती दुरुस्त होऊ शकणार नाही का? तेवढ्यासाठी रागवण्याची खरंच गरज आहे का? हा विचार केलात तरी क्षणात मन, डोकं शांत होऊन सहज पुढच्या कामाला सुरूवात करू शकाल. अन्यथा विचारात अडकून राहाल.

जेव्हा आपण कल्पना आणि वास्तव यात फरक ओळखायला शिकू तेव्हा आपल्याला आपल्याच वाईटात वाईट विचारांची गंमत वाटू लागेल आणि सदासर्वकाळ मन, विचार, डोकं शांत राहील आणि तुम्ही आनंदी राहाल.

Web Title: Just try this 'this' once to keep your head calm! - Sandeep Maheshwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.