Jyestha Amavasya 2023: ज्येष्ठ अमावस्येला वृषभव्रत केल्याने शिवलोकीची प्राप्ती होते म्हणतात; सविस्तर जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 04:52 PM2023-06-14T16:52:44+5:302023-06-14T16:53:11+5:30

Jyestha Amavasya 2023: १८ जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे, त्या दिवशी बैल पोळ्यासारखाच कृषी क्षेत्राशी संबंधित सोहळा केला जातो, वृषभ व्रताचा; त्याबद्दल अधिक वाचा. 

Jyestha Amavasya 2023: Jyestha Amavasya is said to attain Shivloki by doing Vrishabhvrata on Jyestha Amavasya; Let's know in detail! | Jyestha Amavasya 2023: ज्येष्ठ अमावस्येला वृषभव्रत केल्याने शिवलोकीची प्राप्ती होते म्हणतात; सविस्तर जाणून घेऊ!

Jyestha Amavasya 2023: ज्येष्ठ अमावस्येला वृषभव्रत केल्याने शिवलोकीची प्राप्ती होते म्हणतात; सविस्तर जाणून घेऊ!

googlenewsNext

जिवाशिवाची बैल जोड आपल्याला आठवते ती बैलपोळ्याला. परंतु ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी 'वृषभव्रत' नावाने आणखी एक सोहळा पार पाडला जातो, तो म्हणजे बैलपूजेचा. विधी सारखाच असला, तरी उद्दीष्ट वेगळे आहे. ते कोणते, हे जाणून घेऊ.

या तिथीला बैलांची पूजा केली जाते. त्याला बेंदूर म्हणतात. त्यासाठी आदल्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीला लाकडाच्या बैलांची घरातच पूजा केली जाते. धर्माचे प्रतीक म्हणून ही पूजा केली जाते. धर्माला वृष संबोधले गेले आहे. ही पूजा शिवलोकप्राप्तीसाठी केली जाते. 

हे व्रत आणखी एका प्रकारे केले जाते. त्यामध्ये आपल्या सोयीने कुठल्याही महिन्यात शुक्ल सप्तमीला उपवास करून अष्टमीला एका बैलाला दोन शुभ्रवस्त्रांनी वा झुलींनी तसेच गोंडे, मण्यांच्या माळा, फुलमाळा यांनी सजवून त्याची पूजा करून तो दान दिला जातो. भगवान शिवशंकरांना नंदी प्रिय आहे. त्यांचे वाहन बैल आहे. त्यामुळे या पूजेने त्यांना प्रसन्न केले जाते.
 
आपला देश कृषिप्रधान असल्यामुळे बैलांना अतिशय महत्त्व आहे. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण बैलपोळ्याला त्यांची पूजा करून व्यक्त करतोच. परंतु येथे 'धर्म' मानून बैलांची पूजा करण्याच्या विधीमुळे ही पूजा वेगळी ठरली आहे. 

आताच्या काळात शहरात बैल दिसणे दुरापास्त आहे. त्यामुळे हा पुजाविधी करणे अवघड ठरते. यावर पर्याय म्हणून लाकडाच्या बैलांची पूजा सांगितली आहे. ही पूजा सामुहिकरित्यादेखील करता येते. त्यानिमित्ताने बैलांचे पालन पोषण करणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याला दान किंवा आर्थिक मदतही करता येते. कालांतराने विधी-परंपरांचे स्वरूप बदलत असले, तरी धर्म टिकवण्याच्या आणि रुजवण्याच्या दृष्टीकोनातून या तिथींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 

येत्या रविवारी म्हणजे १८ जून रोजी ज्येष्ठ अमावस्येला हे व्रत आहे. यथाशक्ती हे व्रत करून आपणही शिवलोकाची प्राप्ती करू शकतो. 

Web Title: Jyestha Amavasya 2023: Jyestha Amavasya is said to attain Shivloki by doing Vrishabhvrata on Jyestha Amavasya; Let's know in detail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.