Jyestha Purnima 2023: सुख समृद्धीसाठी ज्येष्ठ पौर्णिमेला करा ज्योतिष शास्त्रात दिलेले उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 11:41 AM2023-06-03T11:41:19+5:302023-06-03T11:41:34+5:30

Jyestha Purnima Astro Tips: ३ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे, तिलाच वट पौर्णिमा अशीही ओळख आहे. या दिवशी ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय आवर्जून करा. 

Jyestha Purnima 2023: Do astrological Remedies on Jyestha Purnima for Happiness and Prosperity! | Jyestha Purnima 2023: सुख समृद्धीसाठी ज्येष्ठ पौर्णिमेला करा ज्योतिष शास्त्रात दिलेले उपाय!

Jyestha Purnima 2023: सुख समृद्धीसाठी ज्येष्ठ पौर्णिमेला करा ज्योतिष शास्त्रात दिलेले उपाय!

googlenewsNext

३ जून रोजी सकाळी ११. १९ मिनिटांपासून ज्येष्ठ पौर्णिमा सुरु होत असून ४ जून रोजी सकाळी ९. १२ मिनिटांपर्यंत पौर्णिमेची तिथी असणार आहे. यादिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जातेच, शिवाय पौर्णिमेच्या तिथीनिमित्त लक्ष्मी पूजा आणि अन्य उपायही केले जाते. हे उपाय ज्योतिष शास्त्रात दिले आहेत. दर पौर्णिमेला हे उपाय केले असता त्याचा अधिक लाभ होतो. हे उपाय केल्यास धन आणि सौभाग्य वाढण्यास फायदा होऊ शकतो. या उपायांबद्दल जाणून घेऊया.

या दिवशी पूजेबरोबरच पुढील उपाय करा-

>> देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पौर्णिमेला लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. यासोबतच संध्याकाळी दिव्याचे दान करणे शुभ राहील.

>> पौर्णिमेला चंद्रदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी एका भांड्यात पाणी, दूध आणि थोडे तांदूळ एकत्र करून चंद्राला अर्घ्य द्यावे. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील.

>> जर पती-पत्नीमध्ये काही वाद झाला तर पौर्णिमेच्या वेळी दोघे मिळून चंद्रदेवाला अर्घ्य देतात. यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.

>> कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी लक्ष्मी पूजेसह कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. यानंतर मातेचा आशीर्वाद घेऊन लाल कपड्यात गोवऱ्या बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवाव्यात.

>> धन आणि अन्न वाढीसाठी देवीच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावा. नारळ हे लक्ष्मीचे रूप असल्याचे मानले जाते. म्हणून त्याला आपण श्रीफळ असे म्हणतो. श्री म्हणजे लक्ष्मी. नारळ अर्पण केल्यानेदेखील लक्ष्मी माता प्रसन्न होते. 

>> याशिवाय पौर्णिमेच्या निमित्ताने गोर गरिबांना यथाशक्ती दान, गोमातेची पूजा, मूक प्राणी पक्ष्यांना दाणा पाणी ठेवा, त्यायोगेही भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा वरद हस्त प्राप्त होईल. 

Web Title: Jyestha Purnima 2023: Do astrological Remedies on Jyestha Purnima for Happiness and Prosperity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.