Kalashtami: कालाष्टमीनिमित्त आज सायंकाळी आवर्जून करा 'हा' उपाय, होईल इच्छित फलप्राप्ती!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 10:53 AM2023-02-13T10:53:10+5:302023-02-13T10:53:38+5:30
Kalashtami : दर महिन्यात कालाष्टमी येते, शिवरूप असलेल्या कालभैरवाची पूजा करताना सायंकाळी दिलेला उपाय करा.
आज, सोमवार, १३ फेब्रुवारी २०२३ रोजी मासिक कालाष्टमी आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवशंकराचे स्वरूप असलेल्या कालभैरवची पूजा केली जाते. या मुहूर्तावर ज्योतिष शास्त्रात दिलेला उपाय करा, त्याचा निश्चित लाभ होईल.
कालाष्टमी तिथीचे महत्त्व:
पौराणिक कथेनुसार, कालाष्टमीच्या तिथीवर भगवान शिवाने दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी उग्र रूप धारण केले होते. ते रूप म्हणजे कालभैरवाचे रूप. त्या तिथीची आठवण म्हणून दर महिन्यात कालाष्टमी व्रत केले जाते.
मासिक कालाष्टमी तिथी आणि पूजा शुभ मुहूर्त :
दर महिन्याच्या कृष्ण पक्षात अष्टमी तिथी कालाष्टमी म्हणून साजरी केली जाते. या महिन्यात १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९.४५ वाजता अष्टमी सुरू होईल आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९.४५ वाजता समाप्त होईल. या दिवशी कालभैरवाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
कालाष्टमीच्या दिवशी हे उपाय करा :
सुखी वैवाहिक जीवन मिळवण्याचा उपाय- वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी आज सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी शमीच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने शिवशंकराच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.
धनप्राप्तीचा उपाय- आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी कालाष्टमीला पिंपळाच्या झाडाची पूजा करा. तुमच्या घरात पैशाची आवक झपाट्याने वाढेल.
अज्ञात भीती आणि अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होण्याचा उपाय - जर तुम्हाला विनाकारण एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर कालाष्टमीच्या रात्री कालभैरवाची पूजा करा. त्यानंतर 'ओम हरी बम बटुकाय आपदुद्धाराय कुरुकुरु बटुकाय हरी' या मंत्राचा जप करा. तो शक्य नसेल तर ओम नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करा. याशिवाय आज कालभैरवाष्टकाचे पठण केल्याने खूप शुभ फळ मिळते.