Kalashtami Vastu Tips 2023: कालाष्टमीला करा 'हे' उपाय; घराला होणार नाहीत कोणतेही अपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 04:27 PM2023-03-13T16:27:48+5:302023-03-13T16:28:38+5:30

Kalashtami Vastu Tips 2023: मंगळवारी अर्थात १४ मार्च रोजी फाल्गुन महिन्यातील आणि हिंदू वर्षातील शेवटची कालाष्टमी आहे. त्या मुहूर्तावर करा पूजा आणि जाणून घ्या लाभ!

Kalashtami Vastu Tips 2023: Do 'This' Remedy for Kalashtami; There will be no harm to the house! | Kalashtami Vastu Tips 2023: कालाष्टमीला करा 'हे' उपाय; घराला होणार नाहीत कोणतेही अपाय!

Kalashtami Vastu Tips 2023: कालाष्टमीला करा 'हे' उपाय; घराला होणार नाहीत कोणतेही अपाय!

googlenewsNext

दर महिन्यात येणारी कालाष्टमी तिथी ही महादेवाचा अवतार कालभैरव याला समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार, कालाष्टमीच्या तिथीवर भगवान शिवाने दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी उग्र रूप धारण केले होते. ते रूप म्हणजे कालभैरवाचे रूप. त्या तिथीची आठवण म्हणून दर महिन्यात कालाष्टमी व्रत केले जाते. 

पूजा मुहूर्त : दर महिन्याच्या कृष्ण पक्षात अष्टमी तिथी कालाष्टमी म्हणून साजरी केली जाते. या महिन्यात १३ मार्च २०२३ रोजी रात्रौ ८.२३ मिनिटांनी  अष्टमी सुरू होईल आणि १४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता समाप्त होईल. त्यामुळे कालभैरवाची पूजा १३ तारखेला सायंकाळीच करावी. या दिवशी कालभैरवाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

>>वास्तुदोषापासून वास्तूचे रक्षण व्हावे म्हणून दर महिन्यात कालाष्टमीला वास्तूमध्ये शिवपूजा करा. ओम नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करा. शंकराला अभिषेक घाला. कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणा. 

>>आपण घरात रोज पोळी भाजी करतो. अशा वेळी पोळी केल्यावर पहिल्या पोळीला तूप लावा आणि त्याचे चार समान तुकडे करा. त्यावर गूळ किंवा साखर घाला. एक तुकडा गायीला, दुसरा कुत्र्याला, तिसरा कावळ्याला आणि चौथा तुकडा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. अर्थात व्यक्तीला पोळी देताना एकाऐवजी दोन पोळ्या दिल्या तरी चालेल. असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतील आणि हळूहळू तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धी वाढू लागेल. ज्यांचे घर घेण्याचे स्वप्न आहे, तेही पूर्ण होईल. पोळी, भाकरी हे पदार्थ आपल्यातील नकारात्मकता शोषून घेतात. म्हणून ज्योतिष शास्त्राने हे पदार्थ दान करण्याचा उपाय सांगितला आहे. गुजराती-मारवाडी घरात केले जाणारे रोडगे, बाटी यांचे दानसुद्धा पुण्यप्रद ठरते. 

>>आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी कालाष्टमीला पिंपळाच्या झाडाची पूजा करा. तुमच्या घरात पैशाची आवक झपाट्याने वाढेल.

>>वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी आज सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी शमीच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने शिवशंकराच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. 

Web Title: Kalashtami Vastu Tips 2023: Do 'This' Remedy for Kalashtami; There will be no harm to the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.