Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीला 'हे' तोडगे करा आणि संसार तापातून मुक्त व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 05:03 PM2024-11-21T17:03:04+5:302024-11-21T17:03:49+5:30
Kalbhairav Jayanti 2024: महादेवांनी काळभैरावाचा अवतार घेतला तो कार्तिक अष्टमीला, यंदा २३ नोव्हेंबर रोजी तो उत्सव असणार आहे, त्यासाठी आवश्यक तोडगे!
>> संजय सोपारकर
देवाधिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो. परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो, तो त्यांचा रुद्रावतार! असेच शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव. शनिवारी अर्थात २३ नोव्हेंबर रोजी त्यांची अर्थात काळभैरव जयंती (Kalbhaiirav Jayanti 2024) आहे. त्या साठी काही तोडगे देत आहे. त्याने जीवनात थोडी शांती लाभेल, तसेच अडकलेली कामे होण्यास मदत होईल.
१.. काळभैरव जयंती च्या रात्री काळभैरव अष्टक पाठ किमान २१ वेळा करावा .रात्री १० नंतर..दक्षिण दिशेला मुखं करून पाठ करावा.
२..काळभैरव जयंती दिवशी घरी मोहरी तेलात तळलेले पदार्थ घरी बनवून ठेवा..रात्री ते झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते गरिबांना दान करा..
३..काळभैरव जयंती दिवशी ५ किंवा ११ लिंबू ची माळ बनवून ते काळभैरव याना अर्पण करावे .
४. या दिवशी काळभैरव मंदिरात चंदन आणि गुलाब हे चढवावे..तसेच ३३ सुगंधी उदबत्त्या पेटवून त्या दाखवावा..
५..सव्वा मिटर काळ्या कपड्यात सव्वाशे ग्राम काळे तीळ..सव्वाशे ग्राम.काळे उडीद..सव्वा अकरा रुपये ( वाटल्यास ११ रुपये) काळभैरव मंदिरात मनोकामना बोलून दान द्यावे .म्हणजे मंदिरात ठेवले तरी चालतील..
काळभैरवाचे प्रभावी मंत्र:
ॐ कालभैरवाय नम:।'
ॐ भयहरणं च भैरव:।'
ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाय कुरूकुरू बटुकाय ह्रीं।'
ॐ हं षं नं गं कं सं खं महाकाल भैरवाय नम:।'
ॐ भ्रां कालभैरवाय फट्।'
कालभैरवाला नैवेद्य :
>>प्रत्येक वारानुसार काळभैरव यांचा नैवेद्य निराळा असतो..
>>रविवारी दूध तांदूळ यांची खीर, सोमवारी मोती चुर लाडू, मंगळवारी शुद्घ तूप + गूळ यांचे पदार्थ..किंवा शुध्द तूप + गूळ टाकून बनवलेली लापशी .
>>बुधवारी दही, गुरुवारी बेसन लाडू, शुक्रवारी भाजलेले चणे, शनिवारी तळलेले पापड, उडीद डाळ वडे .जिलेबी इ. यथाशक्ती नैवेद्य अर्पण करू शकतो!