Kamada Ekadashi 2023: डोक्यावर कर्जाचे ओझे आहे? कामदा एकादशीला 'हे' उपाय अवश्य करून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 07:05 AM2023-04-01T07:05:00+5:302023-04-01T07:05:01+5:30

Kamada Ekadashi 2023: कामदा एकादशी ही आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी एकादशी; त्यानिमित्ताने कर्जमुक्तीसाठी ज्योतिष शास्त्राने सांगितलेले काही तोडगे!

Kamada Ekadashi 2023: Head Burdened with Debt? Do try this remedy on Kamada Ekadashi! | Kamada Ekadashi 2023: डोक्यावर कर्जाचे ओझे आहे? कामदा एकादशीला 'हे' उपाय अवश्य करून बघा!

Kamada Ekadashi 2023: डोक्यावर कर्जाचे ओझे आहे? कामदा एकादशीला 'हे' उपाय अवश्य करून बघा!

googlenewsNext

१ एप्रिल रोजी कामदा एकादशी आहे. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशीचे व्रत केले जाते. या व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी मनोभावे पूजा केल्याने भगवान विष्णुकृपा प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छापूर्ती देखील होते.अविवाहितांसाठीदेखील हे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी पुढील उपास केल्यास कर्जमुक्तीसही हातभार लागतो असे म्हणतात. त्यामुळे इप्सित मनोकामनापूर्तीसाठी विष्णूंची पूजा, उपासना करावी आणि कर्जमुक्तीसाठी पुढील उपाय करावेत. 

कामदा एकादशीला हे उपाय करा

>> जर तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने दबले जात असाल तर पिंपळाच्या झाडाला एक कलशभर पाणी अर्पण करा. तसेच पिंपळाच्या झाडाला ११ वेळा प्रदक्षिणा घालून धागा बांधावा आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा मंत्र म्हणावा. याचा फायदा होईल. 

>> व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करिअरला नवी दिशा मिळण्यासाठी पिंपळाचे पान घ्या आणि त्यावर कुंकवाऐवजी हळदीचे स्वस्तिक बनवा. ते पान एखाद्या मंदिरात झाडाच्या बुंध्याशी ठेवून द्या. केळ्याचा नैवेद्य दाखवून गरजू व्यक्तीला केळीचे दान करा. 

>> कष्ट करूनही व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल, तर एकादशीचा उपास करून भगवान विष्णूंची पूजा करावी. उपास शक्य नसेल तर विष्णू सहस्त्र नामाचे पठण करावे किंवा श्रवण करावे. 

>> घरातील सदस्यांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होत असतील तर या दिवशी देवघरातील शंखामध्ये थोडे गंगाजल किंवा कलशातले साधे पाणी भरून भगवान विष्णूला अर्पण करावे. त्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. त्यानंतर हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे त्यामुळे गृहकलह मिटतात. 

Web Title: Kamada Ekadashi 2023: Head Burdened with Debt? Do try this remedy on Kamada Ekadashi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.