Kamala Ekadashi 2023: केवळ अधिक मासातच येणारी एकादशी म्हणजे कमला एकादशी; जाणून घ्या तिचे व्रतमहात्म्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 12:42 PM2023-07-28T12:42:49+5:302023-07-28T12:43:13+5:30

Adhik Maas 2003: वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात, अधिक मासामुळे त्यात दोन एकादशीची भर पडून २६ एकादशींचे पुण्य लाभणार आहे, त्यासाठी करा हे व्रत!

Kamala Ekadashi 2023: Kamala Ekadashi is the only Ekadashi that occurs in adhik months; Know her greatness! | Kamala Ekadashi 2023: केवळ अधिक मासातच येणारी एकादशी म्हणजे कमला एकादशी; जाणून घ्या तिचे व्रतमहात्म्य!

Kamala Ekadashi 2023: केवळ अधिक मासातच येणारी एकादशी म्हणजे कमला एकादशी; जाणून घ्या तिचे व्रतमहात्म्य!

googlenewsNext

हिंदू मराठी महिन्यांप्रमाणे दर महिन्यात दोन एकादशी येतात. अधिक महिना दर तीन वर्षांनी येतो. हा महिना भगवान पुरुषोत्तमाचा म्हटला जातो. या महिन्यात विष्णू पूजेला महत्त्व असते. तसेच या अधिक महिन्यात दोन एकादशीदेखील अधिक येतात. ही तिथी भगवान विष्णूंना अधिक प्रिय असल्यामुळे अधिक मासात येणाऱ्या एकादशीचे महत्त्व अधिक वाढते. मात्र या महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशीला वेगवेगळी नावे नसून एकच असतात. यंदा अधिक मासात २९ जुलै आणि १२ ऑगस्ट रोजी कमला एकादशी येत आहे. या एकादशीला महालक्ष्मीची उपासना करा असेही सांगितले जाते. ती कशी करायची ते जाणून घेऊ. 

एकादशी व्रत हे भगवान विष्णूंची उपासना म्हणून केले जाते. या दिवशी सकाळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे. देवपूजा करावी आणि भगवान विष्णूंच्या प्रतिमेची किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करावी. देवाला गंध लावावे. फुल वाहावे. विष्णू स्तोत्र म्हणावे किंवा 'शांताकारं भुजगशयनं' हा श्लोक म्हणावा. त्यांनतर जप माळ घेऊन 'ओम नमो भगवते वासुदेवाय' हे नाम १०८ वेळा घ्यावे आणि देवाला कमला एकादशी निमित्त कमळ अर्पण करावे. 

त्याचबरोबर हे व्रत महालक्ष्मीच्या उपासनेसाठीही केले जाते, म्हणून या दिवशी महालक्ष्मीलादेखील हळद कुंकू वाहून कमळ पुष्प वाहावे. श्रीसूक्त म्हणावे आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करून तिचा कृपाशिर्वाद मिळवावा. 

नैवेद्य : कमला एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळेस उपास असल्याने उपासाचे पदार्थ न खाता शक्यतो फलाहार करावा आणि लक्ष्मी मातेला खडीसारखरेचा नैवेद्य दाखवावा आणि विष्णूंना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला जेवणाच्या इतर पदार्थाबरोबर खोबऱ्याची करंजी करून एकादशीचे पारणे सोडावे अर्थात व्रत पूर्ती करावी. 

Web Title: Kamala Ekadashi 2023: Kamala Ekadashi is the only Ekadashi that occurs in adhik months; Know her greatness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.