Kamika Ekadashi 2023: मोरपंखी आयुष्य जगायचे असेल तर कामिका एकादशीच्या मुहूर्तावर फॉलो करा 'या' वास्तूटिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 05:20 PM2023-07-12T17:20:13+5:302023-07-12T17:20:29+5:30
Vastu Tips: मोरपंख सगळ्यांना आवडते कारण ते आकर्षक आणि रंगीत असते, असे आपले आयुष्य व्हावे वाटत असेल तर या वास्तू टिप्स फॉलो करा.
आनंद झाला की आपल्याला मोरासारखे नाचावेसे वाटते. एखाद्याचा प्रेमळ स्पर्श मोरपीस फिरवल्याची सुखद अनुभूती देतो. आपल्या मनाचे अंतरंग मोरपंखाप्रमाणे रंगीत आणि आकर्षक असतात, एवढेच नाही तर उमलत्या वयात आपले आयुष्य मोरपिशी होत जाते. मोराशी आणि मोरपंखाशी आपले नाते अगदी फार पूर्वीचे आहे. मोराला पाहिले तरी प्रसन्न वाटते. त्यात तो पावसात आनंदाने पिसारा फुलवून नाचताना दिसला तर आनंदी आनंदच! त्याचे आकर्षण आपल्याला वाटते, तर ज्याने त्याला निर्माण केले त्या परमेश्वराला का वाटू नये? श्रीकृष्णाने तर त्याला आपल्या मुकुटात मानाचे स्थान दिले आहे. तसेच माता सरस्वती, इंद्रदेव, कार्तिकेय आणि गणपती बाप्पालाही अतिशय प्रिय आहे. असे मोरपीस आपल्या घरात सुख, समृद्धी, शांतता आणि आनंद घेऊन येते, म्हणून वास्तूशास्त्रात त्याला अतिशय मानाचे स्थान आहे. १३ जुलै रोजी कामिका एकादशी आहे, त्या मुहूर्तावर या वास्तू टिप्स वापरून बघा.
काही जण आपल्या पुस्तकात, वहीत किंवा भिंतीवर मोरपीस लावणे पसंत करतात. ही केवळ शोभेची वस्तू नाही, तर वास्तू दोष दूर करणारी वस्तू आहे. वास्तुशात्र सांगते -
>> आठ मोरपिसे पांढऱ्या धाग्यात गुंडाळून 'ओम नमो सोमाय नमः' हा मंत्र म्हणून बेडरूमच्या भिंतीवर टांगून ठेवा. यामुळे दाम्पत्य जीवनात काही कुरबुरी असतील, तर त्या दूर होऊन नवरा बायको मध्ये प्रेम निर्माण होते.
>> शनी दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तीन मोरपिसे काळ्या धाग्यात गुंडाळून, सुपारीचे काही तुकडे घेऊन त्यावर पाणी शिंपडावे आणि 'ओम शनैश्वर नमः' हा मंत्र २१ वेळा जपावा.
>> धन वृद्धीसाठी आपल्या तिजोरीत मोरपीस ठेवावे.
>> घरातल्या मुख्य खोलीत अर्थात हॉलमध्ये मोराचे, मोरपंखाचे किंवा कृष्णाचे चित्र लावावे. प्रसन्न वाटते.
>> घराच्या मुख्य दरवाजावर मोरपीस लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो.
>> मोरपिसांचा उपयोग औषध निर्मितीसाठीदेखील केला जातो. ते सतत डोळ्यासमोर असले, तरी मन प्रसन्न राहते आणि मन प्रसन्न राहिल्याने स्वास्थ्य चांगले राहते.
>> एकाग्रता वाढवण्यासाठी मोरपिसाचा वापर केला जातो. मोरपीस पाहून मन शांत होते.