Kedarnath Yatra 2024: बाबा केदारनाथच्या मंदिराचे दरवाजे वैशाखातच का उघडतात? जाणून घ्या रहस्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 12:48 PM2024-04-24T12:48:13+5:302024-04-24T12:48:37+5:30
kedarnath Yatra 2024: १० मे पासून केदारनाथ यात्रा सुरु होत आहे; पण ही यात्रा वैशाखातच असण्यामागे नेमके कारण काय? सविस्तर वाचा.
शिवभक्तांसाठी दरवर्षी मुख्य आकर्षण असते ती म्हणजे केदारनाथ यात्रा! यंदा १० मेपासून ती सुरू होत आहे. केदारनाथ यात्रा दरवर्षी वैशाख महिन्यात सुरू होते. केदारनाथ मंदिराचे दरवाजे फक्त वैशाख महिन्यातच उघडतात, पण इतर कोणत्याही महिन्यात ते का उघडत नाहीत याचा विचार केला आहे का? जर तुम्हालाही याची माहिती नसेल तर वैशाख महिन्यात केदारनाथ धाम उघडण्याचे महत्त्व काय आहे तर त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
वैशाखाचे महत्त्व आणि केदारनाथ धाम :
हिंदू धर्मग्रंथानुसार वैशाख महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. वास्तविक, वैशाख महिना हा हिंदू वर्षातील दुसरा महिना आहे. या महिन्यात वैशाख स्नानालाही अनन्यसाधारण महत्त्व असते. असे म्हणतात, की या महिन्यात भगवान विष्णूंपासून अनेक देवी देवतांनी अवतार घेतला, म्हणून या महिन्याचे महत्त्व अधिक असते. या कारणामुळेच दान-धर्मही या काळात जास्त केला जातो. या वैशाख वणव्यात उन्हामुळे देहाची काहिली होत असताना बाबा केदारनाथ आपले द्वार भक्तांसाठी खुले करतात आणि दर्शनाने व भौगोलिक वातावरणाने भक्तांना गारवा देतात.
असे मानले जाते की, जेव्हा विश्वाची निर्मिती झाली नव्हती तेव्हा सर्व देव थेट वैकुंठात किंवा कैलासावर जाऊन भगवान विष्णू तथा भगवान शंकराची देवी लक्ष्मी तसेच माता पार्वतीसह पूजा करायचे. यानंतर जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली आणि मंदिराची निर्मिती झाली, तेव्हाही स्वर्गातून फक्त देव-देवता येत असत आणि मंदिरांचे दरवाजे उघडून पूजा करत असत.
धर्मग्रंथात असे मानले जाते की जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडतात तेव्हा सर्व दैवी शक्ती मंदिरात उपस्थित असतात. वैशाख महिना हा वर म्हटल्याप्रमाणे देवी देवतांच्या अवतार कार्याचा मानला जातो, त्यामुळे मंदिराचे द्वार उघडण्याचे वेळी त्या सर्व देवी-देवता उपस्थित राहून आशीर्वादाचा वर्षाव करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या कारणास्तव वैशाखमध्ये केदारनाथचे दरवाजे उघडणे अत्यंत शुभ मानले जाते कारण एकीकडे या महिन्यात केदारनाथ धामचे दर्शन करून भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो, तर त्याचवेळेस इतर देवी-देवतांचे आशीर्वादही मिळतात.
त्यामुळे तुम्हीसुद्धा बाबा केदारनाथच्या भेटीला जाणार असाल तर वेळेचे नियोजन करा आणि शिव शंकराबरोबर अन्य देवांचेही आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी दवडू नका. यंदा १० मे ते ३ नोव्हेम्बर या कालावधीत दर्शन घेता येणार आहे. अलीकडे ओनलाईन रेजिस्ट्रेशन करून तीर्थयात्रेस जाता येते.