'श्री स्वामी समर्थ'चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सुखी जीवनाची वचने 

By देवेश फडके | Published: January 7, 2021 06:53 PM2021-01-07T18:53:31+5:302021-01-07T18:57:31+5:30

स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा नेमका अर्थ जाणून घेऊया...

know about the real and exact meaning of shree swami samarth | 'श्री स्वामी समर्थ'चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सुखी जीवनाची वचने 

'श्री स्वामी समर्थ'चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सुखी जीवनाची वचने 

googlenewsNext
ठळक मुद्देश्री स्वामी समर्थ या मंत्राचा नेमका अर्थ वाचाश्री स्वामी समर्थ श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार 'श्री स्वामी समर्थ' हा षडाक्षरी सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र

सन २०२१ नवीन वर्ष सुरू झालेले आहे. नवीन वर्षात अनेकांनी नवीन संकल्प केले असतील. सन २०२० हे अनेकार्थाने वेगळे ठरले. पुन्हा असा अनुभव येऊ नये, असे साकडेच कोट्यवधी भाविकांनी देवासमोर घातले असणार हे नक्की. भारतीय संस्कृती अनेकविध थोर महापुरुष होऊन गेले. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींच्या चरित्राचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे पाहायला मिळते. मात्र, केवळ चमत्कारात न अडकता, प्रत्येकाने 'समर्थ' व्हावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडवावेत, ही स्वामी समर्थ यांची खरी शिकवण आहे, असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष किंवा नामस्मरण हजारो भाविकांकडून अगदी न चुकता केले जाते. श्री स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राचा नेमका अर्थ काय? हे पाहुया...

भारतात शेकडो देवी-देवता आणि त्यांचे हजारो मंत्र आहेत. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनुसार त्याचे पठण करत असते. प्रत्येकाला संस्कृत भाषेतील मंत्र, स्तोत्रे म्हणता येतात असे नाही. म्हणूनच अनेक मंत्र, स्तोत्रे सहज, सुलभ आणि सोप्या भाषेत अनेक संत महंतांनी रचलेली आढळून येतात. स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे, हा स्वामी समर्थांचा आश्वासक मंत्र असून, अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुदेव दत्त हे जसे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, अगदी त्याचप्रमाणे 'श्री स्वामी समर्थ' हा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे, असे सांगितले जाते. 

षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्माण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे, अशी मान्यता आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानले जाते. 'श्री स्वामी समर्थ'मधील श्री म्हणजे स्वयं श्रीपादविराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास 'स्वाः + मी' अशी होते. यातील स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे. 'मी' म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईर्ष्या. अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा. समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा. याचाच अर्थ असा की, 'श्री स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभु शिव तत्त्व सद्गुरुकृपे अंकित करा, असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे, असे सांगितले जाते. 

स्वामी समर्थांची वचने

- भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
- जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो.
- आळशी माणसाचे तोंड पाहू नये.
- शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा.
- जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग.
- भिऊ नकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.
- आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा,राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल.
- मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा.
- हम गया नही जिंदा है.   

Web Title: know about the real and exact meaning of shree swami samarth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.