नित्यनेमाने म्हणा ‘शिव चालीसा’; महादेव पूर्ण करतील मनोकामना, मिळेल लाभ अन् शुभकृपा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 10:57 AM2024-07-25T10:57:58+5:302024-07-25T11:00:52+5:30

Shiv Chalisa Stotra: शिवशंकराचे अनेक मंत्र, स्तोत्र प्रभावी मानले जातात. यापैकी एक असलेले हे स्तोत्र शुभ पुण्य फलदायी मानले जाते. जाणून घ्या...

know about shiv chalisa stotra and recite regularly to get lord mahadev blessings | नित्यनेमाने म्हणा ‘शिव चालीसा’; महादेव पूर्ण करतील मनोकामना, मिळेल लाभ अन् शुभकृपा

नित्यनेमाने म्हणा ‘शिव चालीसा’; महादेव पूर्ण करतील मनोकामना, मिळेल लाभ अन् शुभकृपा

Shiv Chalisa Stotra: चातुर्मास सुरू झाला आहे. यातच आषाढ महिना सुरू असून, ऑगस्ट महिन्यात श्रावण मास सुरू होत आहे. मराठी वर्षात श्रावण आणि श्रावणातील व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांचे महात्म्य आणि महत्त्व मोठे आहे. देवशयनी एकादशीला श्रीविष्णू निद्रिस्त झाल्यानंतर महादेव शिवशंकर या सृष्टीचे चालन-पालन करतात, अशी लोकमान्यता प्रचित असल्याचे सांगितले जाते. श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात जास्तीत जास्त शंकराचे नामस्मरण, उपासना, मंत्र जप, आराधना, स्तोत्रांचे पठण करावे, असे सांगितले जाते. 

उत्तर भारतातील पंचांगानुसार, तिथे श्रावण महिना सुरू झाला आहे. परंतु, महाराष्ट्रासह लगतच्या अन्य भागांमध्ये ०५ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात केले जाणारे रुद्राभिषेक, जलाभिषेक शुभ पुण्यफलदायी मानले जातात. श्रावण मासात शिवशंकराला बेलपत्र अवश्य अर्पण करावे, असे सांगितले जाते. महादेवांचा महिमा वर्णन करणारे अनेक श्लोक, स्तोत्र आहेत. तर काही मंत्र अतिशय प्रभावी ठरतात, असे सांगितले जाते. पैकी ‘शिव चालीसा’ हे स्तोत्र विशेष प्रभावी मानले जाते. नित्यनेमाने त्याचे पठण केल्यास अनेक लाभ होऊ शकतात. महादेवांची कृपा लाभू शकते. शंकरकृपेने कल्याण होऊ शकते. तसेच सुख-समृद्धी प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. हे स्तोत्र म्हणणे शक्य नसेल, तर एकचित्ताने मनोभावे या स्तोत्राचे श्रवण करावे. हे स्तोत्र सुरू असताना मनात महादेवाचे स्मरण करावे. 

‘शिव चालीसा’ स्तोत्र

॥ दोहा ॥

जय गणेश गिरिजा सुवन,मंगल मूल सुजान।
कहत अयोध्यादास तुम,देहु अभय वरदान॥

॥ चौपाई ॥

जय गिरिजा पति दीन दयाला।सदा करत सन्तन प्रतिपाला॥
भाल चन्द्रमा सोहत नीके।कानन कुण्डल नागफनी के॥

अंग गौर शिर गंग बहाये।मुण्डमाल तन क्षार लगाए॥
वस्त्र खाल बाघम्बर सोहे।छवि को देखि नाग मन मोहे॥

मैना मातु की हवे दुलारी।बाम अंग सोहत छवि न्यारी॥
कर त्रिशूल सोहत छवि भारी।करत सदा शत्रुन क्षयकारी॥

नन्दि गणेश सोहै तहँ कैसे।सागर मध्य कमल हैं जैसे॥
कार्तिक श्याम और गणराऊ।या छवि को कहि जात न काऊ॥

देवन जबहीं जाय पुकारा।तब ही दुख प्रभु आप निवारा॥
किया उपद्रव तारक भारी।देवन सब मिलि तुमहिं जुहारी॥

तुरत षडानन आप पठायउ।लवनिमेष महँ मारि गिरायउ॥
आप जलंधर असुर संहारा।सुयश तुम्हार विदित संसारा॥

त्रिपुरासुर सन युद्ध मचाई।सबहिं कृपा कर लीन बचाई॥
किया तपहिं भागीरथ भारी।पुरब प्रतिज्ञा तासु पुरारी॥

दानिन महँ तुम सम कोउ नाहीं।सेवक स्तुति करत सदाहीं॥
वेद माहि महिमा तुम गाई।अकथ अनादि भेद नहिं पाई॥

प्रकटी उदधि मंथन में ज्वाला।जरत सुरासुर भए विहाला॥
कीन्ही दया तहं करी सहाई।नीलकण्ठ तब नाम कहाई॥

पूजन रामचन्द्र जब कीन्हा।जीत के लंक विभीषण दीन्हा॥
सहस कमल में हो रहे धारी।कीन्ह परीक्षा तबहिं पुरारी॥

एक कमल प्रभु राखेउ जोई।कमल नयन पूजन चहं सोई॥
कठिन भक्ति देखी प्रभु शंकर।भए प्रसन्न दिए इच्छित वर॥

जय जय जय अनन्त अविनाशी।करत कृपा सब के घटवासी॥
दुष्ट सकल नित मोहि सतावै।भ्रमत रहौं मोहि चैन न आवै॥

त्राहि त्राहि मैं नाथ पुकारो।येहि अवसर मोहि आन उबारो॥
लै त्रिशूल शत्रुन को मारो।संकट ते मोहि आन उबारो॥

मात-पिता भ्राता सब होई।संकट में पूछत नहिं कोई॥
स्वामी एक है आस तुम्हारी।आय हरहु मम संकट भारी॥

धन निर्धन को देत सदा हीं।जो कोई जांचे सो फल पाहीं॥
अस्तुति केहि विधि करैं तुम्हारी।क्षमहु नाथ अब चूक हमारी॥

शंकर हो संकट के नाशन।मंगल कारण विघ्न विनाशन॥
योगी यति मुनि ध्यान लगावैं।शारद नारद शीश नवावैं॥

नमो नमो जय नमः शिवाय।सुर ब्रह्मादिक पार न पाय॥
जो यह पाठ करे मन लाई।ता पर होत है शम्भु सहाई॥

ॠनियां जो कोई हो अधिकारी।पाठ करे सो पावन हारी॥
पुत्र होन कर इच्छा जोई।निश्चय शिव प्रसाद तेहि होई॥

पण्डित त्रयोदशी को लावे।ध्यान पूर्वक होम करावे॥
त्रयोदशी व्रत करै हमेशा।ताके तन नहीं रहै कलेशा॥

धूप दीप नैवेद्य चढ़ावे।शंकर सम्मुख पाठ सुनावे॥
जन्म जन्म के पाप नसावे।अन्त धाम शिवपुर में पावे॥
कहैं अयोध्यादास आस तुम्हारी।जानि सकल दुःख हरहु हमारी॥

॥ दोहा ॥

नित्त नेम उठि प्रातः ही,पाठ करो चालीसा।
तुम मेरी मनोकामना,पूर्ण करो जगदीश॥

मगसिर छठि हेमन्त ॠतु,संवत चौसठ जान।
स्तुति चालीसा शिवहि,पूर्ण कीन कल्याण॥


 

Web Title: know about shiv chalisa stotra and recite regularly to get lord mahadev blessings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.