सातत्याने पराभव, अपयश येतेय? ‘हे’ स्तोत्र म्हणा, श्रीकृष्णावताराची कृपा मिळवा; लाभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 09:36 AM2024-07-22T09:36:41+5:302024-07-22T09:36:41+5:30

Khatu Shyam Chalisa: हारे का सहारा अशी ओळख असलेल्या तसेच श्रीकृष्णाचा कलियुगातील अवतार मानल्या गेलेल्या देवतेबाबत जाणून घ्या...

know about shri krishna incarnation khatu shyam ji and khatu shyam chalisa for benefits and blessings | सातत्याने पराभव, अपयश येतेय? ‘हे’ स्तोत्र म्हणा, श्रीकृष्णावताराची कृपा मिळवा; लाभ होईल!

सातत्याने पराभव, अपयश येतेय? ‘हे’ स्तोत्र म्हणा, श्रीकृष्णावताराची कृपा मिळवा; लाभ होईल!

Khatu Shyam Chalisa: देशभरात अनेक देवस्थाने, मंदिरे आहेत, ज्यांना अनन्य साधारण असे महत्त्व आहे. त्या स्थानाचे महात्म्य केवळ त्या भागापुरते, परिसरापुरते मर्यादित नाही, तर देश-विदेशात त्याचा महिमा पोहोचलेला आहे. असेच एक स्थान म्हणजे खाटू श्याम मंदिर. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात असलेले खाटू श्याम मंदिर हे लोकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या इच्छापूर्तीसाठी येतात. तीन बाण धारी, शीश दानी आणि हारे का सहारा अशा अनेक नावांनी खाटू श्याम यांना ओळखले जाते. 

काही मान्यतांनुसार, खाटू श्यामजी हे भगवान श्रीकृष्णाचे कलियुगी अवतार आहेत. तर आणखी काही प्रचलित मान्यतांनुसार, खाटू श्याम पांडवांमधील भीम यांचे वंशज घटोत्कच यांचे पुत्र आहेत. खाटू श्याम म्हणजे मां सैव्यम पराजित:। म्हणजेच पराभूत आणि निराशांना बळ देणारा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. खाटू श्याम बाबा हे जगातील सर्वोत्कृष्ट धनुर्धर मानले जातात. खाटूचे श्याम मंदिर खूप प्राचीन आहे. परंतु, औरंगजेबाच्या सैन्याने १६७० च्या दशकात हे मंदिर उद्ध्वस्त केले होते. त्यावेळेस मंदिराच्या रक्षणासाठी अनेक राजपूतांनी बलिदान दिले होते. मात्र, आता सध्याच्या मंदिराची पायाभरणी सन १७२० मध्ये झाली, असे म्हटले जाते. 

खाटू श्याम मंदिर परिसरात बाबा खाटू श्यामची प्रसिद्ध जत्रा भरते. महाभारतात पांडवांसाठी बर्बरिक म्हणजेच खाटू श्याम यांनी आपले शीर कृष्णार्पण केले होते. तत्पूर्वी, महाभारताचे युद्ध पाहण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचे मस्तक एका उंच जागेवर स्थापित केले आणि त्याला निरीक्षणाची दृष्टी दिली, अशी मान्यता आहे. श्रीकृष्णाने वरदान दिले होते की, कलियुगात तुझी माझ्या नावाने पूजा केली जाईल आणि फक्त तुझ्या स्मरणाने भक्तांचे कल्याण होईल.

श्री खाटू श्याम चालीसा

श्री गुरु चरण ध्यान धर, सुमिरि सच्चिदानन्द।
श्याम चालीसा भजत हूं, रच चैपाई छन्द।।

चौपाई

श्याम श्याम भजि बारंबारा,सहज ही हो भवसागर पारा।
इन सम देव न दूजा कोई, दीन दयालु न दाता होई।
भीमसुपुत्र अहिलवती जाया, कहीं भीम का पौत्र कहाया।
यह सब कथा सही कल्पान्तर, तनिक न मानों इनमें अन्तर।

बर्बरीक विष्णु अवतारा, भक्तन हेतु मनुज तनु धारा।
वसुदेव देवकी प्यारे, यशुमति मैया नन्द दुलारे।
मधुसूदन गोपाल मुरारी, बृजकिशोर गोवर्धन धारी।
सियाराम श्री हरि गोविन्दा, दीनपाल श्री बाल मुकुन्दा।

दामोदर रणछोड़ बिहारी, नाथ द्वारिकाधीश खरारी।
नरहरि रूप प्रहलद प्यारा, खम्भ फारि हिरनाकुश मारा।
राधा वल्लभ रुक्मिणी कंता, गोपी बल्लभ कंस हनंता।
मनमोहन चितचोर कहाये, माखन चोरि चोरि कर खाये।

मुरलीधर यदुपति घनश्याम, कृष्ण पतितपावन अभिराम।
मायापति लक्ष्मीपति ईसा, पुरुषोत्तम केशव जगदीशा।
विश्वपति त्रिभुवन उजियारा, दीनबन्धु भक्तन रखवारा।
प्रभु का भेद कोई न पाया, शेष महेश थके मुनियारा।

नारद शारद ऋषि योगिन्दर, श्याम श्याम सब रटत निरन्तर।
कवि कोविद करि सके न गिनन्ता, नाम अपार अथाह अनन्ता।
हर सृष्टि हर युग में भाई, ले अवतार भक्त सुखदाई।
हृदय माँहि करि देखु विचारा, श्याम भजे तो हो निस्तारा।

कीर पड़ावत गणिका तारी, भीलनी की भक्ति बलिहारी।
सती अहिल्या गौतम नारी, भई श्राप वश शिला दुखारी।
श्याम चरण रच नित लाई, पहुंची पतिलोक में जाई।
अजामिल अरु सदन कसाई, नाम प्रताप परम गति पाई।

जाके श्याम नाम अधारा, सुख लहहि दुख दूर हो सारा।
श्याम सुलोचन है अति सुन्दर, मोर मुकुट सिर तन पीताम्बर।
गल वैजयन्तिमाल सुहाई, छवि अनूप भक्तन मन भाई।
श्याम श्याम सुमिरहुं दिनराती, शाम दुपहरि अरु परभाती।

श्याम सारथी सिके रथ के, रोड़े दूर होय उस पथ के।
श्याम भक्त न कहीं पर हारा, भीर परि तब श्याम पुकारा।
रसना श्याम नाम पी ले, जी ले श्याम नाम के हाले।
संसारी सुख भोग मिलेगा, अन्त श्याम सुख योग मिलेगा।

श्याम प्रभु हैं तन के काले, मन के गोरे भोले भाले।
श्याम संत भक्तन हितकारी, रोग दोष अघ नाशै भारी।
प्रेम सहित जे नाम पुकारा, भक्त लगत श्याम को प्यारा।
खाटू में है मथुरा वासी, पार ब्रह्म पूरण अविनासी।

सुधा तान भरि मुरली बजाई, चहुं दिशि नाना जहाँ सुनि पाई।
वृद्ध बाल जेते नारी नर, मुग्ध भये सुनि वंशी के स्वर।
दौड़ दौड़ पहुँचे सब जाई, खाटू में जहाँ श्याम कन्हाई।
जिसने श्याम स्वरूप निहारा, भव भय से पाया छुटकारा।

दोहा

श्याम सलोने साँवरे, बर्बरीक तनु धार। इच्छा पूर्ण भक्त की, करो न लाओ बार।।
 

Web Title: know about shri krishna incarnation khatu shyam ji and khatu shyam chalisa for benefits and blessings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.