गणपती बाप्पाला बुधवारी ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा; सुख-समृद्धी, शुभ-लाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 02:10 PM2022-05-31T14:10:40+5:302022-05-31T14:11:51+5:30

जून आणि ज्येष्ठ मासाची सुरुवात एकाच दिवशी होत असून, बुधवारी केलेले गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण महत्त्वाचे मानले जाते. जाणून घ्या...

know about significance of lord ganesha pujan on wednesday and get best benefits of budhwar ganpati puja | गणपती बाप्पाला बुधवारी ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा; सुख-समृद्धी, शुभ-लाभ मिळवा

गणपती बाप्पाला बुधवारी ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा; सुख-समृद्धी, शुभ-लाभ मिळवा

googlenewsNext

सन २०२२ मधील जून महिन्यात मराठी वर्षामधील ज्येष्ठ महिना सुरू होत आहे. हिंदूपंचांगानुसार चैत्र- वैशाखादी मासगणनेत हा वर्षाचा तिसरा महिना आहे. या मासाच्या पौर्णिमेला किंवा तिच्या मागे-पुढे ज्येष्ठा नक्षत्र असते. म्हणून या महिन्याला `ज्येष्ठ' असे नाव आहे. ज्येष्ठा नक्षत्राचे वैदिक काळातील दुसरे नाव `ज्येष्ठघ्नी' असे होते. `वृत्र' हा असुर सर्व असुरांमध्ये वयाने ज्येष्ठ होता. 'आम्ही वृत्रासुराला मारू' असा निश्चय देवांनी ज्येष्ठा नक्षत्र असताना केला, म्हणून ते ज्येष्ठघ्नी झाले. कालांतराने त्या नावाचा संक्षेप होऊन `ज्येष्ठा' झाले. प्राचीन काळी या मासाचे नाव `शुक्र' असे होते. हा मास उत्तरायणात असतो. ग्रीष्मऋतुचा प्रारंभ या मासापासून होतो. गंगा दशहरा, निर्जला एकादशी वटसावित्रीसह अनेकविध सण-उत्सव, व्रत-वैकल्ये जून महिन्यात साजरी केली जात आहेत. जून आणि ज्येष्ठ महिन्याची सुरुवात बुधवारी होत आहे. (June And Jyeshtha 2022) बुधवार हा प्रथमेश असलेल्या गणपती बाप्पाच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. (Significance of Ganpati Bappa Puja on Wednesday)

गणपती बाप्पाच्या केवळ नामस्मरणाने सकारात्मकता येते. एका चैतन्यमय उर्जेचा संचार होतो. महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते, हे सर्वश्रुत आहे. साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन, नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. (Benefits of Budhwar Ganesh Puja)

बुधवारी बाप्पाची पूजा, नामस्मरण लाभदायक

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल, तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा, नामस्मरण करणे लाभदायक ठरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो, असे मानले जाते. 

बुधवारी दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी

बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

बुधवारी बाप्पाचा आवडता नैवेद्य करा अर्पण

गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वदाचे एखादे फूल वाहावे आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील, तर गोडाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभलाभदायक ठरू शकते, असे सांगितले जाते. तसेच गणपतीचा ‘ॐ गं  गणपतये नम:’ हा मंत्र १०८ वेळा किंवा जितका शक्य असेल, तितक्या वेळा म्हणावा, असे म्हटले जाते. 
 

Web Title: know about significance of lord ganesha pujan on wednesday and get best benefits of budhwar ganpati puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.