तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? पद-प्रतिष्ठा-प्रसिद्धी वृद्धी; सूर्यकृपेने अपार पैसा, लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 07:52 AM2023-11-20T07:52:35+5:302023-11-20T07:54:00+5:30

Numerology: या जन्मतारखेचा मूलांक असलेल्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली असते. स्वाभिमानी असतात, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

know about these 3 birth date people numerology number 1 ank shastra mulank 1 get blessings of surya graha and career money prosperity | तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? पद-प्रतिष्ठा-प्रसिद्धी वृद्धी; सूर्यकृपेने अपार पैसा, लाभ!

तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? पद-प्रतिष्ठा-प्रसिद्धी वृद्धी; सूर्यकृपेने अपार पैसा, लाभ!

Numerology: नवग्रहांमध्ये सूर्य हा अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो. सूर्य नवग्रहांचा राजा मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य बलवान असेल, तर त्याला उच्चपद, नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते, असे सांगितले जाते. नेतृत्व, मान-सन्मान, उदारता, दानशूरपणा, निस्वार्थीपणा, सात्विकता, तेज, नाव, प्रतिष्ठा, कीर्ती, प्रसिद्धी, दयाळूपणा, लोकप्रियता, विश्वासार्हता, परोपकारी, धार्मिक यांचा सूर्य ग्रह कारक मानला जातो. सिंह ही सूर्याचे स्वामित्व असलेली रास मानली जाते. 

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येऊ शकतात. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. नियमित कालावधीने ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. त्याचा प्रभाव मूलांकांवरही पडत असतो, असे सांगितले जाते. 

तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? 

ज्योतिषशास्त्राची एक शाखा असलेल्या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरुन व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्ये, भविष्यकथन केले जाऊ शकते. जसा प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो, तसे अंकशास्त्रातील प्रत्येक मूलांकाला ग्रहांचे स्वामित्व बहाल केले आहे. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म १, १०, १९ किंवा २८ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक १ आहे. सूर्य हा मूलांक १ चा स्वामी आहे. सूर्य सुमारे एक महिना एक राशीत विराजमान असतो. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांती असे म्हटले जाते. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर सूर्य वृश्चिक राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे आगामी महिनाभराचा काळ वृश्चिक संक्रांती म्हणून ओळखला जाईल. 

मूलांक १ साठी शुभ दिवस अन् रंग कोणता?

अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा मूलांक १ असतो, त्या खूप प्रभावशाली आणि प्रतिष्ठित मानल्या जातात. मूलांक १ असलेल्या व्यक्तींसाठी रविवार आणि सोमवार हे शुभ दिवस मानले जातात. तसेच मूलांक १ असलेल्या व्यक्तींसाठी पिवळा रंग शुभ मानला जातो. मूलांक १ असलेल्या व्यक्ती उत्तम उद्योगपती होऊ शकतात. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे, भाषणाची क्षमता आणि वेळेची बांधिलकी यामुळे या व्यक्ती व्यापार, व्यवसाय आणि उद्योगात चांगली प्रगती करतात. आपले प्रत्येक काम चोखपणे करतात. मूलांक १ असलेल्या लोकांना सर्व कामे शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची सवय असते. तसेच वेळेचे व्यवस्थापन, कौशल्य आणि नेतृत्वाच्या गुणवत्तेमुळे या व्यक्ती राजकारण, व्यवस्थापन क्षेत्रात उच्च पदांपर्यंत जातात. या मूलांकांची आर्थिक स्थिती चांगली असते, असे सांगितले जाते.

जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरत नाहीत

मूलांक १ असलेल्या व्यक्ती स्वभावाने मनमिळावू असतात, असे म्हटले जाते. इतकेच नाही तर असे लोक अन्य लोकांशी लवकरच जवळीक वाढवतात. आपल्या गोड बोलण्याने आणि साध्या वागण्याने समोरच्या व्यक्तीचे मन पटकन जिंकतात. या मूलांकाच्या व्यक्ती त्यांच्या कृती आणि बोलण्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकतात. या व्यक्ती प्रामाणिक मानल्या जातात. निर्भय, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात. जीवनात येणाऱ्या अडचणींना ते घाबरत नाहीत, असे सांगितले जाते. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते. 
 

Web Title: know about these 3 birth date people numerology number 1 ank shastra mulank 1 get blessings of surya graha and career money prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.