Numerology: ‘या’ ३ तारखांना जन्मलेल्या लोकांवर असते गुरुची अपार कृपा; कमावतात यश, मान-सन्मान, भरपूर पैसा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 11:47 AM2022-11-21T11:47:00+5:302022-11-21T11:48:37+5:30
Numerology: गुरुकृपा लाभलेल्या या मूलांकाचे लोकं बुद्धी आणि चिकाटीच्या जोरावर नोकरी, व्यवसायात मोठी झेप घेतात, असे सांगितले जाते.
Numerology: ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. ज्योतिषशास्त्राला प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविधा शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येऊ शकतात. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. फक्त जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांक किंवा भाग्यांकावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्ये, भविष्यकथन केले जाऊ शकते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.
नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पति हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रातही गुरुला वरचे स्थान आहे. नोव्हेंबर महिन्यात गुरु स्वराशीत मार्गी होत आहे. धनु आणि मीन या दोन राशींचे स्वामित्व गुरुकडे आहे. राशीचक्राप्रमाणे अंकशास्त्रातही गुरुकडे एका मूलांकाचे स्वामित्व आहे. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म ३, १२, २१ किंवा ३० या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ३ आहे. गुरु हा मूलांक ३ चा स्वामी आहे. अंकशास्त्रानुसार हे लोक ऊर्जावान असतात. तसेच धैर्यवान आणि निर्भय असतात. प्रत्येक संकटाला ते धैर्याने सामोरे जातात.
साहसी आणि उत्तम नेतृत्व करणारे मानले जातात
मूलांक ३ असलेले लोकं साहसी असतात. या व्यक्तींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. मूलांक ३ असलेल्या व्यक्ती खूप मोकळ्या मनाच्या आणि स्वभावाच्या असतात. त्यांना त्यांचे जीवन स्वातंत्र्याने जगणे आवडते. स्वभावाने या व्यक्ती शांतीप्रिय, कोमल मनाचे, मृदुभाषी आणि सत्यवादी असतात. मूलांक ३ असलेले लोकं बुद्धिमान, धैर्यवान आणि निर्भय आहेत. कोणाचीही कामात अनावश्यक ढवळाढवळ त्यांना अजिबात आवडत नाही.
गुरुमुळे होतात बुद्धिमान, प्रतिभावान आणि महत्त्वाकांक्षी
अंकशास्त्रानुसार, मूलांक ३ असलेले लोकं खूप बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी असतात. तसेच प्रतिभावानही असतात. हे लोक कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असतात. हे लोक कोणत्याही कामाला विचार न करता हात लावत नाहीत. जे काही काम सुरू करतो ते पूर्ण करूनच थांबतात. त्यांचे परिश्रम आणि कोणत्याही कामाची आवड त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करते. त्यांच्या उच्च महत्वाकांक्षेमुळे ते नेहमीच प्रगती करतात.
व्यापार आणि करिअरमध्ये मिळते अपार यश, प्रगती
मूलांक ३ असलेल्या व्यक्ती व्यवसायातही खूप पुढे जातात. मूलांक ३ असलेले लोकं त्यांच्या कलात्मक विचार आणि ज्ञानाने त्यांच्या व्यवसायाला एक नवीन आयाम देतात. व्यापारातील समर्पण आणि मेहनतीमुळे त्यांना चांगले पैसे मिळतात. ज्ञान आणि विवेकबुद्धीच्या जोरावर या व्यक्ती नोकरीत उच्च पदांपर्यंत जाऊन पोहोचतात. गुरुकृपेमुळे करिअरमध्ये अपार यश आणि प्रगती साध्य करू शकतात. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"