Numerology: ‘या’ ३ तारखांना जन्मलेल्या लोकांना मिळतात धनदेवता कुबेराचे शुभाशिर्वाद; पैसे कमी पडत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 01:01 PM2022-02-10T13:01:52+5:302022-02-10T13:03:38+5:30
Numerology: धनदेवता कुबेरमुळे पैशांची चणचण भासत नाही, धनलाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते.
ज्योतिषशास्त्र असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.
एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४ आणि २३ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रह हा नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला आहे. बुध ग्रह उत्तम बुद्धी, तर्कक्षमता कारक असल्याचे सांगितले जाते. मूलांक ५ असलेल्या व्यक्तींवर धनदेवता कुबेरांची विशेष कृपा असते. या मूलांकाच्या व्यक्तींना कुबेर देवाचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. धनदेवता कुबेरमुळे पैशांची चणचण भासत नाही, आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. धनलाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते.
संवाद कौशल्य खूप चांगले असते
मूलांक ५ असलेल्या व्यक्ती खूप आकर्षक असतात. बुध वाणीचा कारक मानला गेला आहे. त्यामुळे आपल्या बोलण्याने वाणीमुळे समोरची व्यक्ती या व्यक्तींचा प्रभाव पडतो. मूलांक ५ असलेल्या व्यक्तींची तर्क करण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य खूप चांगले असते. यांचा जनसंपर्क, मित्र परिवार खूप मोठा असतो. कौटुंबिक जीवनही आनंदी असते, असे म्हटले जाते.
व्यापार, उद्योगात यश आणि प्रगती
मूलांक ५ असलेले लोक नेहमीच आव्हानांना आव्हाने म्हणून स्वीकारतात आणि कोणत्याही परस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न करतात. हे लोक नवीन योजनांवर काम करून नफा कमावतात. व्यवसायात जोखीम पत्करायला ते नेहमीच तयार असतात. हे लोक मनी माइंडेड आणि बिझनेस माइंडेड असतात. मूलांक ५ असलेल्या लोकांना व्यापार, उद्योगात चांगले यश मिळते. प्रगती साध्य करू शकतात. बँकिंग, शिक्षण, प्रशिक्षण या क्षेत्रात करिअर करू शकतात. या व्यक्तींना अर्थशास्त्र आणि संगीताचेही चांगले ज्ञान असते, असे सांगितले जाते.