जाणणे  भूतकाळ विरहित गतिविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 07:23 PM2021-02-17T19:23:20+5:302021-02-17T19:24:36+5:30

Spirituality आम्हापैकी बहुतांश भूतकाळातच जगतात आणि भूतकाळानेच संतुष्ट होतात.

Knowing past non-activity | जाणणे  भूतकाळ विरहित गतिविधी

जाणणे  भूतकाळ विरहित गतिविधी

Next

समज केवळ एक बौध्दिक प्रक्रिया नाही. आपलीच माहिती एकत्रित करणे आणि आपल्या संबंधात स्वतःला समजणे दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. कारण जे ज्ञान तुम्ही आपल्या संबंधात संचित करता ते सदैव भूतकाळातील असते आणि एक मन जे भूतकाळाशी बांधल्या गेलेले आहे एक दुःखी मन आहे. आपल्याच संबंधात अध्ययन करणे म्हणजे कोणत्या भाषेचे शिकणे अथवा तांत्रिकतेचे ज्ञान घेणे किंवा वर्तमानात काेणतेही काही शिकण्यासारखे नाही. कारण माहिती सदेैव भूतकाळात असते. जसे की आम्हापैकी बहुतांश भूतकाळातच जगतात आणि भूतकाळानेच संतुष्ट होतात. मग माहिती  आमच्या करिता असाधारण महत्वाची होते.
                            म्हणून  विव्दान, चतूर, चलाखांची आम्ही अभ्यासासाठी आराधना करतो.   परंतु जर तुम्ही सदैव, प्रती क्षण पाहणे आणि ऐकण्यातून अनुभव करुन आणि अभ्यासपूर्वक जाणत आहात, तर तुम्हाला कळेल की जाणणे ही भूतकाळ विरहित एक निरंतर गतिविधी आहे. 
                    जर तुम्ही म्हणाल, तुम्ही  तुमच्या संबंधात हळुहळु, अधिकाधिक माहिती मिळवून थोडे थोडे समजू, तर आता तुम्ही आपले अध्ययन, आपला अभ्यास नाही करीत आहात, जसे की तुम्ही आहात.   खरे तर तुम्ही प्रत्यक्ष माहितीच  मिळवाल. जाणणे एका श्रेष्ठतम संवेदनशिलतेची सूचक आहे.  जर संवेदनशिलता नाही आणि कोणी विचार आहे जो भूतकाळाचा आहे तर तो वर्तमानाला दाबणारा असेल. तेव्हां मन जास्त काळ तीक्ष्ण, कोमल व सावध नाही  राहणार.
                आमच्यातील अधिकांश लोक शारीरिक रुपानेही संवेदनशील नाहीत. आम्ही आवश्यकते पेक्षा जास्त भोजन घेतो. आम्ही उचित भोजन मात्रेची चिंता नाही करत. अत्याधिक धुम्रपान करतो. अधिक मात्रेत दारु पितो. यामुळे आमची शरीरं स्थुल व असंवेदनशिल होतात.
स्वतःचे जीवात ध्यानाचे स्वरुपच संवेदनशुन्य झाले आहे. 
                  एक अती चैतन्यवान, संवेदनशिल, निर्मळ मन कसे राहील, जर जीवच स्वतः संवेदनशुन्य आणि जड आहे ? आम्ही काही वस्तुंप्रती संवेदनशिल असू शकतो, ज्यांचेशी आमचे वैयक्तिक संबंध असतील, परंतु खर्‍या अर्थाने जीवनाची निहितार्थाने जी गरज आहे ती पूर्णपणे 
संवेदनशील होणे आहे की जेथे जीव आणि चित्ताचे दरम्यान कोणतीही वेगळीक नसावी. ही एक संपूर्ण गतिविधी आहे.

 -     शं.ना.बेंडे पाटील

Web Title: Knowing past non-activity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.