Kojagiri Purnima 2021 : वर्षभरातला सर्वात मोठा चंद्र आजच्या दिवशी दिसतो; अधिक जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 08:00 AM2021-10-19T08:00:00+5:302021-10-19T08:00:02+5:30

Sharad Purnima 2021 : चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शीतल आहे एवढेच नाही, तर तो उपयोगी व उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे.

Kojagiri Purnima 2021: The largest moon of the year appears today; Learn more! | Kojagiri Purnima 2021 : वर्षभरातला सर्वात मोठा चंद्र आजच्या दिवशी दिसतो; अधिक जाणून घ्या!

Kojagiri Purnima 2021 : वर्षभरातला सर्वात मोठा चंद्र आजच्या दिवशी दिसतो; अधिक जाणून घ्या!

googlenewsNext

कोजागरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव! त्या दिवशी चंद्र स्वत:च्या सोळाही कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्यादृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा मोठा वाटतो. चातुर्मासातील चार महिन्यात आकाश मेघांनी घेरलेले असते, त्यामुळे चंद्रदर्शन स्पष्ट होत नाही. त्यामुळेदेखील कोजागरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो. 

Kojagiri Purnima 2021 : बायकोने आपले ऐकावे असे ज्या नवऱ्यांना वाटते, त्यांनी कोजागरी पौर्णिमा कहाणी वाचाच!

चंद्राजवळ सुंदरता व शीतलता यांचा समन्वय पहायला मिळतो. केवळ बाह्य सौंदर्य कित्येक वेळा मोहक, मादक व दाहकही बनते. परंतु त्यात जेव्हा आंतर सौंदर्य मिसळते त्यावेळी ते शीतल व शांतिदायक बनते. संतांजवळ चंद्राच्या शीतल चांदण्यासारखे सौंदर्य असते. आपल्या अगदी जवळचे अवतार राम व कृष्ण. यांच्याजवळही शांत व प्रसन्न सौंदर्य होते. म्हणूनच लोक त्यांना रामचंद्र, कृष्णचंद्र म्हणू लागले, असे सुंदर विवेचन प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले करतात.

गीतेत भगवंताने `नक्षत्राणामहं शशी' असे म्हणून चंद्राला स्वत:ची विभूती मानले आहे. सूर्याच्या तेजाकडे पाहणे कठीण आहे पण चंद्रासमोर तासनतास मांडी घालून बसू शकतो. चंद्र हा मनाचा देव आहे. संतप्त मनाचा माणूस पौर्णिमेच्या चांदण्यात फिरायला निघाला तर त्याला मानसिक शांततेचा अनुभव येतो. 

चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शीतल आहे एवढेच नाही, तर तो उपयोगी व उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. भगवान गीतेत सांगतात, `रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करतो. पुष्णामि चौषधी: सर्वा: सोमो भूत्वा रसात्मक:!'

Kojagiri Purnima 2021 : ऐश्वर्यप्राप्तीसाठी कोजागरीला करतात गजपूजाविधी व्रत; कसे ते जाणून घ्या!

या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे दुधासोबत खावेत. चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत म्हणून कोजागरी पौर्णिमा हा धवलरंगी उत्सव म्हणून गणला जातो. या दिवशी नाचायचे, बागडायचे, गायचे, रास गरबा खेळायचा पण या सर्व आनंदात उज्ज्वलता राखायची. विशुद्ध मनाचे आणि निर्मळ अंत:करणाने जो उत्सवाचा उल्ल्हास किंवा जिवनाचा आनंद मिळवू शकतो तो पूर्णत: प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. असा संदेश देणारा शरदाचा चंद्र रात्रभर गगनात फिरत असतो. आपणही तो संदेश पाळला तर किती चांगले होईल...!

Web Title: Kojagiri Purnima 2021: The largest moon of the year appears today; Learn more!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.