Kojagiri Purnima 2023: पौर्णिमेचे चंद्र दर्शन कधीही चुकवू नका; कोजागिरी पौर्णिमेचे तर नाहीच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 03:43 PM2023-10-20T15:43:18+5:302023-10-20T15:44:19+5:30
Kojagiri Purnima 2023: कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातली सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे, त्यादिवशी चंद्र दर्शन घेतल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घ्या.
सूर्य जितका तापदायक, चंद्र तेवढाच शीतल, शांत. तरी दोघांचे महत्त्व आपापल्या जागी मोठंच आहे. तरी देखील पृथ्वीवरून दिसणारे हे दोन देव त्यांची पूजा अर्चा आपल्या संस्कृतीने सांगितली आहे. २८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. त्या सायंकाळी चंद्रदर्शन घ्यायला विसरून नका. जाणून घ्या फायदे...
चंद्राजवळ सुंदरता व शीतलता यांचा समन्वय पहायला मिळतो. केवळ बाह्य सौंदर्य कित्येक वेळा मोहक, मादक व दाहकही बनते. परंतु त्यात जेव्हा आंतर सौंदर्य मिसळते त्यावेळी ते शीतल व शांतिदायक बनते. संतांजवळ चंद्राच्या शीतल चांदण्यासारखे सौंदर्य असते. आपल्या अगदी जवळचे अवतार राम व कृष्ण. यांच्याजवळही शांत व प्रसन्न सौंदर्य होते. म्हणूनच लोक त्यांना रामचंद्र, कृष्णचंद्र म्हणू लागले, असे सुंदर विवेचन प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले करतात.
गीतेत भगवंताने `नक्षत्राणामहं शशी' असे म्हणून चंद्राला स्वत:ची विभूती मानले आहे. सूर्याच्या तेजाकडे पाहणे कठीण आहे पण चंद्रासमोर तासनतास मांडी घालून बसू शकतो. चंद्र हा मनाचा देव आहे. संतप्त मनाचा माणूस पौर्णिमेच्या चांदण्यात फिरायला निघाला तर त्याला मानसिक शांततेचा अनुभव येतो.
चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शीतल आहे एवढेच नाही, तर तो उपयोगी व उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. भगवान गीतेत सांगतात, `रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करतो. पुष्णामि चौषधी: सर्वा: सोमो भूत्वा रसात्मक:!'
चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ. समुद्र मंथनात तो तिच्या पाठोपाठ आला. त्याची आणि लक्ष्मी मातेची जन्मतिथी एकच, ती म्हणजे पौर्णिमा. त्यामुळे या तिथीवर दोघांचे पूजन करून त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि चंद्राचे शीतल चांदणे पडलेले दूध नैवेद्य म्हणून प्राशन केले जाते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे चंद्र दर्शन कठीणच, पण जर पावसाचा जोर उतरला, आकाश निरभ्र झाले तर त्याचे दर्शन घेण्याची संधी अजिबात सोडू नका.
पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन का घेतले पाहिजे? त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या!
वर्षाच्या बाराही पौर्णिमांशी काही ना काही सण उत्सव जोडलेले आहेत, त्यानिमित्ताने चंद्र दर्शन व्हावे हा त्यामागचा मूळ हेतू; पण का? वाचा.
सूर्य जितका तापदायक, चंद्र तेवढाच शीतल, शांत. तरी दोघांचे महत्त्व आपापल्या जागी मोठंच आहे. तरी देखील पृथ्वीवरून दिसणारे हे दोन देव त्यांची पूजा अर्चा आपल्या संस्कृतीने सांगितली आहे. आज अधिक श्रावण मासातील पौर्णिमा, या दृष्टीने आजच्या तिथीचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे आजच्या तिथीला चंद्रदर्शन घ्यायला विसरून नका. जाणून घ्या फायदे...
चंद्राजवळ सुंदरता व शीतलता यांचा समन्वय पहायला मिळतो. केवळ बाह्य सौंदर्य कित्येक वेळा मोहक, मादक व दाहकही बनते. परंतु त्यात जेव्हा आंतर सौंदर्य मिसळते त्यावेळी ते शीतल व शांतिदायक बनते. संतांजवळ चंद्राच्या शीतल चांदण्यासारखे सौंदर्य असते. आपल्या अगदी जवळचे अवतार राम व कृष्ण. यांच्याजवळही शांत व प्रसन्न सौंदर्य होते. म्हणूनच लोक त्यांना रामचंद्र, कृष्णचंद्र म्हणू लागले, असे सुंदर विवेचन प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले करतात.
गीतेत भगवंताने `नक्षत्राणामहं शशी' असे म्हणून चंद्राला स्वत:ची विभूती मानले आहे. सूर्याच्या तेजाकडे पाहणे कठीण आहे पण चंद्रासमोर तासनतास मांडी घालून बसू शकतो. चंद्र हा मनाचा देव आहे. संतप्त मनाचा माणूस पौर्णिमेच्या चांदण्यात फिरायला निघाला तर त्याला मानसिक शांततेचा अनुभव येतो.
चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शीतल आहे एवढेच नाही, तर तो उपयोगी व उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. भगवान गीतेत सांगतात, `रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करतो. पुष्णामि चौषधी: सर्वा: सोमो भूत्वा रसात्मक:!'
चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ. समुद्र मंथनात तो तिच्या पाठोपाठ आला. त्याची आणि लक्ष्मी मातेची जन्मतिथी एकच, ती म्हणजे पौर्णिमा. त्यामुळे या तिथीवर दोघांचे पूजन करून त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि चंद्राचे शीतल चांदणे पडलेले दूध नैवेद्य म्हणून प्राशन केले जाते. तर यंदाही कोजागिरीला चंद्र दर्शन घ्या आणि मसाला दुधाचा आस्वाद घ्या!