Kojagiri Purnima 2024: कोजागरीच्या रात्री 'ही' महालक्ष्मीस्तुती म्हणायला अजिबात विसरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:57 AM2024-10-15T10:57:04+5:302024-10-15T10:57:31+5:30

Kojagiri Purnima 2024: कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मीची उपासना करण्याची इच्छा आहे पण विधी माहीत नाही? लक्ष्मीस्तोत्रासह सविस्तर माहिती जाणून घ्या.

Kojagiri Purnima 2024: Don't forget to say 'this' Mahalakshmistuti on the night of Kojagiri! | Kojagiri Purnima 2024: कोजागरीच्या रात्री 'ही' महालक्ष्मीस्तुती म्हणायला अजिबात विसरू नका!

Kojagiri Purnima 2024: कोजागरीच्या रात्री 'ही' महालक्ष्मीस्तुती म्हणायला अजिबात विसरू नका!

>> सचिन मधुकर परांजपे, पालघर

"आश्विन पौर्णिमा" ही कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2024) किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.यास 'माडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.

कोजागरी पौर्णिमेचा उपासना काळ :  या वर्षी दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ (बुधवारी) कोजागिरी पौर्णिमा आहे. त्या अनुषंगाने साधकांनी पुढील उपासना करावी. संध्याकाळी ७.४६ ते रात्री १०.५२ या काळात उपासना करावी.

उपासनेच्या वेळी परिधान करायचे वस्त्र : या काळात साधकांनी प्रथम आंघोळ करुन शक्यतो शुभ्र पांढरे वस्त्र (लेंगा, धोतर, ड्रेस, पांढरी पॅन्ट, काहीही, व स्त्रीयांनी शक्यतो पांढरी शुभ्र न नेसता त्यावर किंचित डिझाईन असलेली किंवा कोणतीही लाईट रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करावा. पांढरा शर्ट. ब्लाऊज अगदी नसेल तर कोणताही लाईट रंग चालेल., पण भडक रंग नको) त्यानंतर तुमच्याकडील श्रीलक्ष्मी मातेच्या फोटोची किंवा मुर्तीची पंचोपचार किंवा जमेल तशी पूजा करावी. सुगंधी धुप-अगरबत्ती-अत्तर- रंगीत फुले- हळदीकुंकू यांनी पुजेचे उपचार करावेत. मन:पूर्वक प्रार्थना करावी आणि त्यानंतर खालील स्तोत्राचे जमतील तसे, जमतील तितके पण मन:पुर्वक पाठ करावेत. स्तोत्राचे उच्चार कठीण वाटत असतील तर सावकाशपणे एकेक अक्षर उच्चारत पाठ केलात तरी चालण्यासारखे आहे. स्तोत्र म्हणजे स्तुती (आपल्या मातृमय श्री महालक्ष्मी मातेची स्तुती मोडक्यातोडक्या शब्दात केली तरी हरकत नाही हा भाव मनी असावा) उच्चारांचं जास्त टेन्शन घेऊ नका....मात्र स्तोत्रवाचन सुरु असताना अखंड नंदादीप किंवा तुपाचे निरांजन सुरु ठेवावे. स्तोत्र वाचन झाल्यानंतर मनोभावे पुनश्च प्रार्थना करावी. काही चुकले-माकले असल्यास क्षमा मागावी.

॥ महालक्ष्मीस्तुती ॥

आदि लक्ष्मि नमस्तेऽस्तु परब्रह्म स्वरूपिणि ।

यशो देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ १॥

सन्तान लक्ष्मि नमस्तेऽस्तु पुत्र पौत्र प्रदायिनि ।

पुत्रां देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ २॥

विद्या लक्ष्मि नमस्तेऽस्तु ब्रह्म विद्या स्वरूपिणि ।

विद्यां देहि कलां देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ३॥

धन लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व दारिद्र्य नाशिनि ।

धनं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ४॥

धान्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वाभरण भूषिते ।

धान्यं देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ५॥

मेधा लक्ष्मि नमस्तेऽस्तु कलि कल्मष नाशिनि ।

प्रज्ञां देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ६॥

गज लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व देव स्वरूपिणि ।

अश्वांश गोकुलं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ७॥

धीर लक्ष्मि नमस्तेऽस्तु पराशक्ति स्वरूपिणि ।

वीर्यं देहि बलं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ८॥

जय लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व कार्य जयप्रदे ।

जयं देहि शुभं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ९॥

भाग्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु सौमाङ्गल्य विवर्धिनि ।

भाग्यं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ १०॥

कीर्ति लक्ष्मि नमस्तेऽस्तु विष्णुवक्ष स्थल स्थिते ।

कीर्तिं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ११॥

आरोग्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व रोग निवारणि ।

आयुर्देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ १२॥

सिद्ध लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व सिद्धि प्रदायिनि ।

सिद्धिं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ १३॥

सौन्दर्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वालङ्कार शोभिते ।

रूपं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ १४॥

साम्राज्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु भुक्ति मुक्ति प्रदायिनि ।

मोक्षं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ १५॥

मंगले मंगलाधारे मांगल्य मंगल प्रदे ।

मंगलार्थ मंगलेशि मांगल्य देहि मे सदा ॥ १६॥

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।

शरण्ये त्रयम्बके देवि नारायणि नमोऽस्तुते ॥ १७॥

शुभं भवतु कल्याणी आयुरारोग्य सम्पदाम् ।

मम शत्रु विनाशाय दीप ज्योति नमोऽस्तुते ॥ १८॥

दीप ज्योति नमोऽस्तुते, दीप ज्योति नमोऽस्तुते॥

Web Title: Kojagiri Purnima 2024: Don't forget to say 'this' Mahalakshmistuti on the night of Kojagiri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.