Laxmi Mantra: इष्ट मनोकामनापूर्तीसाठी दर शुक्रवारी प्रत्येकाने म्हणावे अष्टलक्ष्मी स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 07:00 AM2023-06-09T07:00:00+5:302023-06-09T07:00:01+5:30

Laxmi Mantra: स्तोत्र, मंत्रात प्रचंड ताकद असते, त्याचा अनुभव स्वतः घेऊन पहावा, त्यामुळे परिस्थिती बदलते आणि मनस्थितीही!

Laxmi Mantra: Ashtalakshmi Stotra should be chanted every Friday for wish fulfillment! | Laxmi Mantra: इष्ट मनोकामनापूर्तीसाठी दर शुक्रवारी प्रत्येकाने म्हणावे अष्टलक्ष्मी स्तोत्र!

Laxmi Mantra: इष्ट मनोकामनापूर्तीसाठी दर शुक्रवारी प्रत्येकाने म्हणावे अष्टलक्ष्मी स्तोत्र!

googlenewsNext

अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरजा असल्या, तरी या गरजा भागतात त्या पैशांमुळेच! या पलीकडे जाऊन सांगायचे, तर आपले भौतिक सुख सुद्धा आपल्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती पैसे कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेते. या प्रयत्नांना लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची जोड मिळाली, तर घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. म्हणूनच आपण प्रयत्नांना उपासनेचीही जोड द्यावी, असे शास्त्र सांगते. 

स्तोत्र पठणाचा आणखी एक लाभ म्हणजे, आपल्याला जे हवे आहे ते आपल्या पूर्वजांनी प्रासादिक शब्दात वर्णन करून ठेवले आहे. तेच प्रभावी शब्द स्तोत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्याला त्या स्तोत्राचे केवळ पठण, उच्चारण अथवा श्रवण करायचे आहे आणि त्यामुळे होणारे लाभ मिळवायचे आहेत. त्यामुळे आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून थोडी उपासना मनापासून आपण करूच शकतो. बरोबर ना? आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पुढील उपासना दर शुक्रवारी सायंकाळी करावी. 

श्री अष्टलक्ष्मी स्त्रोतम:

आदि लक्ष्मी

सुमनस वन्दित सुन्दरि माधवि चंद्र सहोदरि हेममये ।
मुनिगण वन्दित मोक्षप्रदायिनी मंजुल भाषिणि वेदनुते ।

पङ्कजवासिनि देवसुपूजित सद-गुण वर्षिणि शान्तिनुते ।
जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि परिपालय माम् ।

धान्य लक्ष्मी:

अयिकलि कल्मष नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।
क्षीर समुद्भव मङ्गल रुपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते ।

मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रित पादयुते ।
जय जय हे मधुसूदनकामिनि धान्यलक्ष्मि परिपालय माम् ।

धैर्य लक्ष्मी:

जयवरवर्षिणि वैष्णवि भार्गवि मन्त्र स्वरुपिणि मन्त्रमये ।
सुरगण पूजित शीघ्र फलप्रद ज्ञान विकासिनि शास्त्रनुते ।
भवभयहारिणि पापविमोचनि साधु जनाश्रित पादयुते ।
जय जय हे मधुसूदन कामिनि धैर्यलक्ष्मि सदापालय माम् ।

गज लक्ष्मी:

जय जय दुर्गति नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।
रधगज तुरगपदाति समावृत परिजन मंडित लोकनुते ।
हरिहर ब्रम्ह सुपूजित सेवित ताप निवारिणि पादयुते ।
जय जय हे मधुसूदन कामिनि गजलक्ष्मि रूपेण पालय माम् ।

सन्तान लक्ष्मी:

अयि खगवाहिनी मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये ।
गुणगणवारिधि लोकहितैषिणि सप्तस्वर भूषित गाननुते ।
सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वन्दित पादयुते ।
जय जय हे मधुसूदन कामिनि सन्तानलक्ष्मि परिपालय माम् ।

विजय लक्ष्मी: 

जय कमलासनि सद-गति दायिनि ज्ञानविकासिनि गानमये ।
अनुदिन मर्चित कुङ्कुम धूसर भूषित वसित वाद्यनुते ।
कनकधरास्तुति वैभव वन्दित शङ्करदेशिक मान्यपदे ।
जय जय हे मधुसूदन कामिनि विजयक्ष्मि परिपालय माम् ।

विद्या लक्ष्मी:

प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि शोकविनाशिनि रत्नमये ।
मणिमय भूषित कर्णविभूषण शान्ति समावृत हास्यमुखे ।
नवनिद्धिदायिनी कलिमलहारिणि कामित फलप्रद हस्तयुते ।
जय जय हे मधुसूदन कामिनि विद्यालक्ष्मि सदा पालय माम् ।

धन लक्ष्मी:

धिमिधिमि धिन्धिमि धिन्धिमि-दिन्धिमी दुन्धुभि नाद सुपूर्णमये ।
घुमघुम घुङ्घुम घुङ्घुम घुङ्घुम शङ्ख निनाद सुवाद्यनुते ।
वेद पुराणेतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते ।
जय जय हे कामिनि धनलक्ष्मी रूपेण पालय माम् ।

अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।
विष्णुवक्षःस्थलारूढे भक्तमोक्षप्रदायिनी ।।
शङ्ख चक्र गदाहस्ते विश्वरूपिणिते जयः ।
जगन्मात्रे च मोहिन्यै मङ्गलम शुभ मङ्गलम ।

। इति श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम सम्पूर्णम ।

Web Title: Laxmi Mantra: Ashtalakshmi Stotra should be chanted every Friday for wish fulfillment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.