आपल्या ध्येयपूर्तीसाठी जाणून घ्या सफाला एकादशीचे महत्त्व, कथा आणि पूजाविधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 05:44 PM2021-12-29T17:44:29+5:302021-12-29T17:44:59+5:30

असे मानले जाते की जी व्यक्ती एकादशीचे नियम खऱ्या भक्तीने पाळते ती विष्णूंच्या कृपेस पात्र होते. तिच्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतात.

Learn the importance of Safala Ekadashi, stories and rituals for fulfilling your goal! | आपल्या ध्येयपूर्तीसाठी जाणून घ्या सफाला एकादशीचे महत्त्व, कथा आणि पूजाविधी!

आपल्या ध्येयपूर्तीसाठी जाणून घ्या सफाला एकादशीचे महत्त्व, कथा आणि पूजाविधी!

googlenewsNext

उद्या मार्गशीर्षातला गुरुवार आणि सफला एकादशी या दोन्ही तिथी एकत्र आल्या आहेत. या दिवशी जगाचे पालनपोषण करणारे भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा केली जाते. वैष्णव संप्रदायातील लोक आवर्जून एकादशीचा उपास करतात. 

एकादशी व्रताचे पालन करण्याचेही अनेक नियम आहेत. या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. असे मानले जाते की जी व्यक्ती एकादशीचे नियम खऱ्या भक्तीने पाळते ती विष्णूंच्या कृपेस पात्र होते. तिच्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतात. केवळ एकादशीची कथा ऐकल्याने मनुष्याला प्रतिकूल परिणाम प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे. चला, जाणून घ्या सफला एकादशीची व्रत कथा आणि पूजा पद्धती-

सफला एकादशीची व्रतकथा

प्राचीन काळी चंपावतीच्या राज्यात महिष्मान नावाचा एक प्रतापी राजा राहत होता अशी आख्यायिका आहे. त्याचा मुलगा लंपक खूप क्रूर होता. त्यांनी जनतेच्या हिताचे कोणतेही काम केले नाही, उलट ते जनतेवर अत्याचार करायचे. त्यामुळे लोकांमध्ये भयग्रस्त वातावरण होते. हे जाणून महिष्मान राजाने आपल्या मुलाला नगरातून हाकलून दिले. त्यावेळी राजाच्या मुलाला शहरात चोरी करण्याचा विचार आला आणि तो चोरी करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या अंधारात नगरात शिरला.

मात्र, लंपक चोरी करताना पकडला गेला. मग शहरवासीयांनी लंपकला ओळखले. गर्दीतील एक जण म्हणाला - तो राजा महिष्मानाचा पुत्र आहे. त्यांना सोडा. लंपक माफी मागून पळून गेला. यानंतर लंपक कसे तरी आपले जीवन जगू लागला.एक दिवस प्रचंड थंडीमुळे लंपक थरथर कापू लागला. तो दिवस होता सफला एकादशीचा! त्या दिवशी तो पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूंना आर्त साद घालू लागला. 

यादरम्यान त्याने अन्न किंवा पाणी घेतले नाही. सूर्यास्तानंतर लंपकने देवाचे स्मरण करून फळ घेतले. अशा प्रकारे लंपकने नकळत सफला एकादशीला उपवास केला. लंपक त्याच्या पुण्यमय प्रतापाने फार लवकर बरा झाला आणि त्याने सर्व राक्षसी काम सोडले. आणि विष्णूंच्या कृपेने तो सन्मार्गाला लागला. त्याचे विष्णू पूजेचे व्रत सफल झाले. अशी आहे सफला एकादशीची कथा. 

आपणही विष्णुकृपेस पात्र होण्यासाठी पुढीलप्रमाणे सफला एकादशीची पूजा करावी : 

एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीपासून हा उपास सुरू करावा. दुसऱ्या दिवशी एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून ध्यान करावे. विष्णू सहस्त्र नाम किंवा अन्य कोणतेही स्तोत्र म्हणावे. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूची फळे, फुले, धूप, दीप, कापूर-वात, इत्यादींनी पूजा करावी. दिवसभर उपवास करावा आणि फलाहार करणार असल्यास सूर्यास्तानंतर करावा व त्यानंतर काहीही खाऊ नये. सायंकाळी दिवे लागण झाल्यावर आरती करावी आणि दुसऱ्या दिवशी विष्णूंना फुल वाहून एकादशी व्रत पूर्ण करावे. 

Web Title: Learn the importance of Safala Ekadashi, stories and rituals for fulfilling your goal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.