या उन्हाळ्यात यथाशक्ती करूया जलदान, भागवू मूक जीवांची तहान!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 08:00 AM2021-03-12T08:00:00+5:302021-03-12T08:00:07+5:30

आपण सर्वांनी मिळून आई भगवतीला तृष्णा रूपाने सर्वांची तहान भागवावी, सर्व जीवांना जीवदान द्यावे, अशी प्रार्थना केली पाहिजे. 

Let's do our best this summer, let's quench the thirst of birds and animals! | या उन्हाळ्यात यथाशक्ती करूया जलदान, भागवू मूक जीवांची तहान!

या उन्हाळ्यात यथाशक्ती करूया जलदान, भागवू मूक जीवांची तहान!

googlenewsNext

मार्च महिना सुरू काय सुरू झाला आणि सूर्यदेवांनी तपमानात वाढ करायला सुरुवात केली. त्यात घामाच्या धारा आणि पाणीटंचाई हे विजोड समीकरण! दर दोन दिवसांनी पाण्याचे टँकर मागवा नाहीतर पाणी यायची वाट बघत बसा. ही अवस्था मार्चमध्ये, अजून तर एप्रिल आणि मे काढायचा आहे. तेव्हा काय परिस्थिती असेल, याची कल्पनाही करवत नाही. आपले हे हाल तर बिचाऱ्या प्राणिमात्रांचे काय हाल होत असतील, हा विचार करून आपण भूतदयेपोटी शक्य तेवढे जलदान केले पाहिजे. पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. उन्हातान्हात थकून भागून आलेल्या व्यक्तीला निदान पाणी विचारले पाहिजे. हा आपला अतिथी धर्म आहे. त्याचे पालन निश्चितच केले पाहिजे. 

याशिवाय आपण सर्वांनी मिळून आई भगवतीला तृष्णा रूपाने सर्वांची तहान भागवावी, सर्व जीवांना जीवदान द्यावे, अशी प्रार्थना केली पाहिजे. 

या देवी सर्वभूतेषु तृष्णा-रूपेण संस्थिता। 
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ 

सदर श्लोकात तृष्णा हा शब्द इच्छा या अर्थी वापरला आहे. सर्वांची इच्छापूर्ती व्हावी, अशी श्लोकात प्रार्थना केली आहे. परंतु जेव्हा पाण्याचा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा डोळ्यात पाणी येते आणि अन्य कोणतीही इच्छा उरत नाही. म्हणून आपणही मनोभावे देवीला प्रार्थना करूया आणि यथाशक्ती जलदान करूया. 

Web Title: Let's do our best this summer, let's quench the thirst of birds and animals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.