अर्जुनाला विजयी करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गरुडध्वज रथाचीच निवड का केली, ते जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:08 IST2021-11-24T17:07:44+5:302021-11-24T17:08:10+5:30

भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शक्तींनी प्रभावित झालेल्या रथाने अर्जुनाला संरक्षण कवच दिले असे म्हणता येईल!

Let's find out why Lord Krishna chose the eagle flag chariot to conquer Arjuna! | अर्जुनाला विजयी करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गरुडध्वज रथाचीच निवड का केली, ते जाणून घेऊ!

अर्जुनाला विजयी करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गरुडध्वज रथाचीच निवड का केली, ते जाणून घेऊ!

भगवान श्रीकृष्ण ६४ कलांमध्ये निपुण होते आणि सोबत त्यांचा शिष्य सर्वोत्तम धनुर्धर अर्जुन होता. तो द्वंद्वयुद्धातही निपुण होता. याशिवायकृष्णाकडे अनेक शस्त्रास्त्रे होती. त्यांची नारायणी सेना महाभारत काळातील सर्वात बलशाली सेना होती. श्रीकृष्णानेच कलरीपट्टू नावाच्या लढाईच्या कलेचा शोध लावला, ज्याला आता मार्शल आर्ट म्हणतात.श्रीकृष्णाच्या धनुष्याचे नाव 'सारंग' होते. त्यांच्या खड्गाचे नाव 'नंदक', गदेचे नाव 'कौमुदकी' आणि शंखाचे नाव 'पांचजन्य' होते, जो गुलाबी रंगाचा होता. महाभारतात श्रीकृष्णाचे दोन रथ होते. चला त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

१. श्री कृष्णाचे २ अतिशय दिव्य रथ होते. पहिल्याचे नाव गरुडध्वज आणि दुसऱ्याचे नाव जैत्र.

२. गरुडध्वजाच्या सारथीचे नाव दारुका होते आणि त्याच्या घोड्यांची नावे शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प होती.

३. श्रीकृष्णाचा जैत्र नावाचा सेवकही होता आणि एक रथही होता. या रथांचा उल्लेख श्रीमद भागवत महापुराणात आढळतो.

४. गरुडध्वज रथ हा अतिशय वेगवान रथ होता. या रथावर स्वार होऊन रुक्मिणीचे अपहरण करण्यात आले. वादळाच्या वेगाप्रमाणे हा रथ मंदिराजवळ क्षणभर थांबला आणि श्रीकृष्णाने लगेचच राजकुमारी रुक्मिणीला रथावर बसवले आणि रथाचे घोडे पूर्ण वेगाने धावले, असे म्हणतात.

५ श्रीकृष्णाने हा रथ स्वर्गातून आणला असे म्हणतात. बिहारच्या राजगीरमध्ये अशी काही ठिकाणे आहेत जी महाभारत काळाशी संबंधित आहेत. यापैकी एक श्रीकृष्णाच्या रथाच्या खुणा आहेत. हाच रथ श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धात वापरला होता. या रथाच्या शिरावर खुद्द हनुमंत बसले होते म्हणून शत्रू सैन्यातून येणाऱ्या दुष्ट शक्तींपासून अर्जुनाचा बचाव होऊ शकला. 

Web Title: Let's find out why Lord Krishna chose the eagle flag chariot to conquer Arjuna!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.